आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराऔरंगाबाद रस्त्याच्या कडेला झोपडीवजा दुकान थाटून स्वेटरसह ब्लँकेट्स विकणाऱ्या दुकानातून ब्लँकेट्स उचलून नेतांना रोखल्याने टोळक्याने गोळीबार करून दुकानदाराला बेदम मारहाण केल्याप्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलिसांनी सहा जणांच्या मुसक्या आवळल्या. आहेत. सहाही आरोपींना 17 डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस.जी. गुणारी यांनी दिले.
संतोष ऊर्फ राजू विश्वनाथ झाल्टे (38, रा. सावित्रीबाई फुले नगर, वडगाव कोल्हाटी), प्रथमेश संजू कांबळे (23, सलामपुरे नगर, वडगाव को.), प्रशांत दत्तात्रय बनसोडे (29, रा. गांधीनगर, रांजनगाव शे.पु ता. गंगापुर), अशोक गोरखनाथ दाभाडे (28, रा. समतानगर ता. गंगापुर), किशोर अशोक खरात (28, परथरी ता.जि. औरंगाबाद) आणि सय्यश शोएब अली ऊर्फ गुड्डू मुमताज अली (31, रा. राहुल नगर, रेल्वे स्टेशन) अशी आरोपींची नावे आहेत.
प्रकरणात जखमी मुकेश नथुलाल बंजारा (26, रा. मोतीपुर,सितामऊ जि. मनसोर मध्यप्रदेश ह.मु. ओयासीस चौक, एमाआयडीसी वाळूज) यांनी फिर्याद दिली. त्यानूसार, औरंगाबाद-अहमदनगर महामार्गावर स्वेटर, ब्लँकेट विक्री करण्याचे काम फिर्यादी व त्यांचे नातेवाईक करतात. मंगळवारी दि.13 रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास एका चारचाकी (एमएच 20 एजी 6001) वाहनातून पाच ते सहाजण या ठिकाणी आले. ते फिर्यादीच्या दुकानातून ब्लँकेट्स चोरी करत होते. मात्र फिर्यादीला जाग आली. त्याने आरोपींकडे पैशांची मागणी केली. त्यावर तु आम्हाला ओळखत नाही का असे म्हणत फिर्यादीला लोखंडी रॉडने माराहण सुरु केली. आरडाओरड ऐकून शेजारील फिर्यादीचे नातेवाईक जमा झाले. टोळक्याने त्यांच्यावर देखील हल्ला करण्याचा प्रयत्न केला, मात्र दुकानदारांनी टोळक्याच्या दिशेने दगड भिरकावण्यास सुरुवात केल्याने टोळक्यातील एकाने गावठी कट्ट्यातून दगडफेक करणाऱ्या दुकानदारांच्या दिशेने गोळीबार करित चारचाकी सोडून तेथून धूम ठोकली. प्रकरणात एमआयडीसी वाळुज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपींच्या चारचाकीतून पोलिसांनी लाकडी, लोखंडी रॉड, मिर्ची पूड जप्त केली. आरोपी संतोष ऊर्फ राजू झाल्टे याने तिसगावशिवारातील मनाईहुकूम असलेल्या एका जागेवर अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केला आहे, याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल आहे. तसेच आरोपी विरोधात सिटीचौक पोलिस ठाण्यात देखील गुन्हा दाखल आहे. अशोक दाभाडे याच्यावर देखील गंगापूर ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
आरोपींना आज न्यायालयात हजर करण्यात आले असता, सहायक सराकरी वकील उद्धव वाघ यांनी आरोपींनी गुन्ह्यात वापरलेला गावठी कट्टा हस्तगत करयाचा आहे. आरोपींनी अशा प्रकारे आणखी किती गुन्हे केले आहेत. आरोपींच्या कारमध्ये सापडलेली हत्यारामुळे आरोपी हे मोठा गुन्हा करण्यासाठी जात असल्याचे समोर येत असून ते नेमके कोठे चालले होते याचा देखीलतपास बाकी असल्याने आरोपींना पोलिस कोठडी देण्याची विनंती न्यायालयाकडे केली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.