आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

वाढीव संचारबंदी:नांदेडमध्ये उद्या उघडणार नाहीत दुकाने; संचारबंदीमध्ये केली 23 जुलै पर्यंतची वाढ, जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आदेश

नांदेड3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कर्फ्यू उठल्यानंतरही आता सोमवार ते शुक्रवारच सुरू राहणार दुकाने, अटी-शर्ती लागू

जिल्ह्यातील संचारबंदीमध्ये आणखी 3 दिवसांची वाढ करण्यात आली आहे. यापूर्वी 12 ते 20 जुलैपर्यंत संचारबंदी (कर्फ्यू) लागू करण्यात आला होता. आता हा कर्फ्यू 23 जुलैपर्यंत लागू राहील असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी रविवारीच जारी केले आहेत. उल्लेखनीय बाब म्हणजे, 24 तारखेपासून मिशन बिगीन अगेनला सुरुवात होत असली तरीही त्यामध्ये अटी-शर्ती लागू राहतील असे जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या आदेशात स्पष्ट केले आहे.

नांदेडमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी 7 जुलै ते 12 जुलै पर्यंत प्रशासनाकडून मिशन ब्रेक द चेन नावाची मोहिम राबवण्यात आली होती. त्यामध्ये विविध टीम नेमूण जिल्ह्यातील एकूणच परिस्थितीची पाहणी करण्यात आली होती. त्यानंतरच कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी कर्फ्यूची घोषणा केली होती. 12 आणि 13 जुलैच्या मध्यरात्रीपासून 20 जुलै पर्यंत ही संचारबंदी लागू करण्यात आली. यामध्ये अत्यावश्यक सेवा वगळता इतरांना घरातच राहण्याचे आवाहन करण्यात आले होते. 7 दिवसांचा लॉकडाउन मंगळवारी उघडणे अपेक्षित होते. परंतु, रविवारीच जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश जारी करून संचारबंदीमध्ये 3 दिवसांची वाढ केली.

24 तारखेपासून हे नियम पाळावे लागतील...

24 जुलैपासून सुरू होणाऱ्या मिशन बिगीन अगेनमध्ये नागरिकांना अटी-शर्तींचे पालन करावे लागेल. रोज संध्याकाळी 5 वाजल्यापासून सकाळी 7 वाजेपर्यंत संचारबंदी लागू राहील. यात अत्यावश्यक वस्तू आणि सेवा देणाऱ्यांना सूट राहील. विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई केली जाईल. 65 वर्षांपुढील नागरिक, गर्भवती, आजारी व्यक्तींना घराबाहेर मेडिकल एमर्जंसीशिवाय नेता येणार नाही. बाइकवर एक, ऑटो रिक्शामध्ये 1+2, कारमध्ये 1+2 इतक्या लोकांना परवानगी राहील. जिल्ह्यांतर्गत सार्वजनिक बस सेवेला 50 टक्के प्रवाशांसह आणि सर्व दुकाने उघडण्यास परवानगी राहील. परंतु, सोशल डिस्टन्सिंग नाही पाळल्यास दंडात्मक व कायदेशी कारवाई केली जाईल.