आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

औरंगाबादकरांना दिलासा:औरंगाबादमध्ये 21 मे पासून सहा तासांसाठी खुली राहणार दुकाने

औरंगाबादएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या 1073, बळींचा आकडा 36 वर

औरंगाबाद महानगर पालिकेचे उपायुक्त अस्तीक कुमार पांडेय यांनी मंगळवारी शहरातील  खाद्य, किराना, भाजी-पाला, दुकाने, हातगाडे इत्यादींना 21 मे पासून सकाळी 7 वाजेपासून सहा तासांसाठी खुले ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे.

औरंगाबादमध्ये दररोज कोरोना संक्रमितांचा आकडा वाढत आहे. यावर आळा घालण्यासाठी आयुक्तांच्या निर्देशांनुसार आरोग्य सेवेला सोडून इतरांसाठी 17 ते 20 मे पर्यंत संपूर्ण लॉकडाउन घोषित करण्यात आला आहे. पांडेय यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, सकाळी सात पासून सहा तासांसाठी म्हणजेच, दुपारी एक वाजेपर्यंत सर्व दुकाने उघडण्यास परवानगी असेल आणि किराना सामान घरपोच देतेवेळी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे लागेल. तसेच, पुढे ते म्हणाले की, सर्वांनी दररोज मास्कचा वापर करावा. कुठेही गर्दी करू नये आणि सर्वांनी नियमांचे पालन करावे.

जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या 1073, बळींचा आकडा 36 वर

औरंगाबाद जिल्ह्यात आज 51 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यात आढळलेल्या कोरोनाबाधितांची एकूण संख्या 1073 झाल्याचे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. तसेच, बळींचा आकडा 36 वर गेला असू, आतापर्यंत 300 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

बातम्या आणखी आहेत...