आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करावडापावच्या दुकानात शॉर्टसर्किट झाल्याने तेल व इतर साहित्यांमुळे आतील भाग आगीने वेढला गेला. त्यानंतर दुकानातील सिलिंडरचा स्फोट होऊन जवळची दोन दुकाने आगीच्या विळख्यात येऊन त्यातील लाखोंचा ऐवज जळून खाक झाला. ही घटना शनिवारी रात्री १२ वाजता छावणीतील नेहरू चौकात घडली.
या ठिकणी गौरव दरख यांचे कपड्यांचे दुकान असून शेजारी टिल्लू वडापावचे दुकान आहे. शनिवारी रात्री दुकानात अचानक आग लागली व वडापावच्या दुकानातील सिलिंडरचा मोठा स्फोट झाला. सिलिंडर दुकानाबाहेर उडाले व जवळील कपड्याच्या दुकानाने पेट घेतला. घटनेची माहिती मिळताच पदमपुरा, सिडको अग्निशमन केंद्रातील बंबासह ४ खासगी पाण्याचे टँकर घटनास्थळी दाखल झाले. दोन तासांच्या परिश्रमानंतर जवानांना आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. यात वडापावच्या दुकानासह शेजारील दुकानातील सर्व कपडे व सुरेश चौरसिया यांचे मेडिकलमधील औषधी जळून खाक झाली. अधिकारी एच. वाय. घुगे, विनायक लिमकर, संपत भगत, संजय कुलकर्णी, सोमीनाथ भोसले यांनी घटनास्थळी धाव घेतली.
सोलापूर-धुळे मार्गावर टेम्पो पेटला सोलापूर-धुळे महामार्गावर चालत्या छोट्या टेम्पोने रविवारी दुपारी ४ वाजता पेट घेतला. हेे कळताच चालक टेम्पो थांबवून बाजूला झाला. मात्र, आग मोठी असल्याने टेम्पो जळून खाक झाला. यात कुठलीही जीवितहानी झाली नाही. आगीचे कारण मात्र कळू शकले नाही.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.