आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहानगरपालिका मुख्य प्रशासकीय इमारतीतील अतिरिक्त आयुक्त बी. बी. नेमाने यांच्या कार्यालयासमोर असलेला इलेक्ट्रिक पॅनलला आग लागली. कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान साधत त्वरित वीज पुरवठा खंडित करत आग आटोक्यात आणली, त्यामुळे मोठा अनर्थ टळला. यादरम्यान कोणतीही जीवित किंवा वित्तीय हानी झाली नाही. हा प्रकार आज दुपारी घडला.
इलेक्ट्रीक केबलला आग
महानगरपालिका मुख्यालयातील पहिल्या मजल्यावर असलेल्या अतिरिक्त आयुक्त बी.बी. नेमाने यांच्या केबिन वरील इलेक्ट्रिक पॅनलला अचानक दुपारी तीन वाजेच्या सुमारास आग लागली. त्या ठिकाणी असलेल्या इलेक्ट्रिक केबल आग धरली होती.
आग नियंत्रकाद्नारे आणली आटोक्यात
आग आटोक्यात आणताना कर्मचारीकर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत वीजपुरवठा खंडित केला. त्यानंतर फायर एकस्टिंगविषरच्या साह्याने इलेक्ट्रिक पॅनलला लागलेली आग आटोक्यात आणली गेली आली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. काही क्षणातच अग्निशामक दलाची गाडी महानगर पालिका आवारात दाखल झाली होती.
तोपर्यंत आग आटोक्यात कर्मचाऱ्यांना यश आले होती. त्यावेळी अतिरिक्त आयुक्त बी.बी. नेमाने हे त्यांच्या केबीनमध्येच होते. आग ठोक्याला आल्यानंतर अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी केली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.