आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

पाऊस:राज्यात अल्पकाळ पावसात खंड शक्य, मान्सूनचा आस हिमालयाकडे, मोसमी वारे उत्तरेकडे

औरंगाबाद3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • राज्यात तुरळक पाऊस, बऱ्याच ठिकाणी थोडासा ब्रेक

मान्सूनचा आस हिमालयाकडे सरकला आहे. त्यातच वायव्य भारत व पाकिस्तानातील पश्चिमी चक्रवात स्थितीमुळे नैऋत्य मोसमी वारे उत्तरेकडे खेचले जात आहेत. परिणामी राज्याकडे येणारे मान्सूनचे वारे उत्तरेकडे वळल्याने राज्यात पावसात खंड पडण्याची शक्यता आहे. हवामान विभागानुसार, राज्यात ३१ जुलैपर्यंत तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल.

मध्य भारतासह राज्यात चांगला पाऊस होण्यास कारणीभूत असलेला कमी दाबाचा पट्टा अर्थात मान्सूनचा आस आता हिमालयाकडे सरकला आहे. सर्वसाधारणपणे राजस्थानपासून ते आसामपर्यंत हा आस असल्यास देशभरात चांगला पाऊस पडतो. मात्र हा पट्टा उत्तरेकडे सरकला आहे. अरबी समुद्रावरून महाराष्ट्राकडे येणारे बाष्पयुक्त मोसमी वारे उत्तरेकडे प्रवाहित झाले आहेत. परिणामी राज्यात पावसात अल्पकाळ खंड पडण्याची शक्यता आहे.

राज्यात तुरळक पाऊस, बऱ्याच ठिकाणी थोडासा ब्रेक
राज्यात मान्सून सक्रिय राहण्यासाठी सध्या प्रतिकूल परिस्थिती आहे. मान्सून ट्रफ हिमालयाकडे जाणे आणि वेस्टर्न डिस्टर्बन्स यामुळे राज्यातील पावसावर परिणाम होणार आहे. राज्यात तुरळक ठिकाणी पाऊस होईल, मात्र बऱ्याच ठिकाणी पावसात खंड पडेल. - डॉ. रामचंद्र साबळे, हवामानतज्ञ