आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हिंगोली:देशी बनावटीच्या पिस्तुलासह एक छर्ऱ्याची बंदूक जप्त, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

हिंगोलीएका महिन्यापूर्वीलेखक: मंगेश शेवाळकर
  • कॉपी लिंक
  • कडाक्याच्या थंडीत साध्या वेशातील पोलिसांचा बोडखा येथे छापा

सेनगाव तालुक्यातील बोडखा येथे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवारी (ता. ४) पहाटे चारवाजता कडाक्याच्या थंडीत साध्या वेशात जाऊन एका घरावर टाकलेल्या छाप्यात देशी बनावटीचे पिस्तुल, तीन जिवंत काडतुस, एक छर्ऱ्याची बंदूक, खंजीर व काही छर्रे जप्त केले आहेत. या प्रकरणी दोघांना अटक केली आहे.

सेनगाव तालुक्यातील बोडखा येथे धनसिंग उर्फ भाऊ शेषराव राठोड याच्या घरात देशी बनावटीचे पिस्तुल व छर्ऱ्याची बंदूक व इतर हत्यार असल्याची माहिती दहशतवाद विरोधी पथक व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. त्यानंतर आज पहाटे चार वाजता पोलिस अधिक्षक राकेश कलासागर, अप्पर पोलिस अधिक्षक यशवंत काळे, सहाय्यक पोलिस अधिक्षक यतीश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे निरीक्षक पंडीत कच्छवे, उपनिरीक्षक शिवसांब घेवारे, सुभाष आढाव पाटील, बाबासाहेब खार्डे, जमादार शंकर जाधव, विलास सोनवणे, माणिक डुकरे, माधव भडके, रुपेश धाबे, महेश बंडे, शेख शफी, आकाश टापरे, महिला पोलिस कर्मचारी पुनम वाघमारे, बोचरे, प्रकाश कांबळे यांच्या पथकाने बोडखा येथे जाऊन एका घराला वेढा दिला.

त्यानंतर पोलिस निरीक्षक कच्छवे व घेवारे यांनी घराच्या दरवाजा वाजवला. मात्र पहाटेच कोण आले हे पाहण्यासाठी धनसिंग उर्फ भाऊ याने दरवाजा उघडला असता समोर पोलिस अधिकारी दिसून आले. त्याला काही कळण्याच्या आतच पोलिसांनी घरात जाऊन चार खोल्यांची तपासणी केली. यामध्ये एका खोलीत देशी बनावटीचेे पिस्तुल व तीन जिवंत काडतुस, तसेच बाजुला एक छर्ऱ्याची बंदूक व खंजीर तसेच एका पिशवीत छर्रे आढळून आले. पोलिसांनी सदर ऐवज जप्त करून धनसिंग उर्फ भाऊ व नवनाथ शेषराव राठोड या दोघांना ताब्यात घेतले. या प्रकरणी औंढा नागनाथ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.

देशी पिस्तुलाचे कर्नाटक कनेक्शन

पोलिस निरीक्षक कच्छवे यांच्या पथकाने धनसिंग राठोड याची चाैकशी केली असता त्याने ऊसतोडीसाठी कर्नाटक राज्यात जात असल्याचे सांगितले. त्या ठिकाणावरूनच एका व्यक्तीने सहा महिन्यापुर्वी पिस्तुल दिल्याचे त्यांनी सांगितले. मात्र सहा महिन्यापुर्वी ऊसतोड नव्हती असा सवाल पोलिसांनी केला असता त्याने सदर पिस्तुल जिंतूर येथे एका व्यक्तीने आणून दिल्याचे सांगितले. त्यामुळे प्राथमिक चौकशीत देशी पिस्तुलाचे कर्नाटक कनेक्शन दिसून येत आहे.

पोलिस निरीक्षक कच्छवे यांच्या पथकाला पारितोषीक

स्थानिक गुन्हे शाखेचा प्रभारी पदभार मिळाल्यानंतर पोलिस निरीक्षक कच्छवे यांच्या पथकाने तीन दिवसांत मोठी कामगिरी केली आहे. वीस वर्षापासून फरार आरोपीस अटक केली तर पंधरा वर्षापासून फरार असलेल्या एका आरोपीस अटक केली आहे. त्यानंतर हि मोठी कारवाई आहे. त्यांच्या या कामगिरी बद्दल पोलिस अधिक्षक राकेश कलासागर यांनी कच्छवे यांच्या पथकाला परितोषीक जाहिर केले आहे.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser