आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हिंगोली:कोरोना केअर सेंटरमधील गैरहजर राहणाऱ्या आठ जणांना कारणे दाखवा नोटीस, उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे यांचा दणका

हिंगोली3 महिन्यांपूर्वीलेखक: मंगेश शेवाळकर
  • कॉपी लिंक

हिंगोली शहरातील कोरोना केअर सेंटरवर गैरहजर राहणाऱ्या आठ जणांना कारणे दाखवा नोटीस बजावून २४ तासात खुलासा करण्याचे आदेश उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे यांनी मंगळवारी ( ता. २५) दिले आहेत.

हिंगोली शहरासह जिल्ह्यात मागील काही दिवसात कोरूना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत असून त्याअंतर्गत हिंगोली उपविभागात विविध ठिकाणी कोरोना केअर सेंटर स्थापन करण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्या सूचनेवरून या ठिकाणी विविध शासकीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचार्‍यांच्या नियुक्त्या करण्यात आले आहेत.

सदरील सेंटरवर अत्यावश्यक सोयी सुविधा वेळेत पोहोचतात किंवा कसे याबाबत खात्री करण्यासाठी तसेच सेंटरवर उपस्थित होणाऱ्या विविध अडीअडचणी जाणून घेऊन त्या पूर्ण करण्यासाठी या नियुक्त्या करण्यात आलेल्या आहेत.

दरम्यान उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे यांनी विविध ठिकाणी दिलेल्या भेटीमध्ये आठ जण गैरहजर असल्याचे आढळून आले. त्यावरून चोरमारे यांनी सय्यद जलील जाफर (कृषी अधीक्षक कार्यालय हिंगोली ) महमद तोसिफ (सार्वजनिक बांधकाम विभाग हिंगोली ) एस. डी. पडघन, जे. एन. आठवले (स्थानिक निधी लेखा परीक्षा कार्यालय हिंगोली) डी.जे. गायकवाड (औद्योगिक प्रशिक्षण संस्था हिंगोली ), अधीक्षक (शासकीय तंत्रनिकेतन मुलीचे वसतिगृह लिंबाळा ), अधीक्षक (अल्पसंख्याक मुलीचे वसतिगृह लिंबाळा) अधिक्षक (शासकीय तंत्रनिकेतन मुलांचे वसतिगृह लिंबाळा ) यांना वरिष्ठांच्या आदेशाचे पालन न करणे, शासकीय कामात टाळाटाळ करणे, कोरोना केअर सेंटरवर अनधिकृतपणे गैरहजर राहणे ठेवणे या सर्व बाबी केल्याचे दिसून येते. त्यावरून त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. सदर प्रकरणात २४ तासात खुलासा सादर करण्याच्या सुचना देण्यास आल्या आहेत.