आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हिंगोली:सोशल मिडीयावरील व्हायरल क्लिपवरून हिंगोलीच्या नायब तहसीलदारास कारणे दाखवा नोटीस, तातडीने खुलासा करण्याचे आदेश

हिंगोलीएका वर्षापूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • रविवारी तहसील कार्यालयाचे अधिकारी दुकान तपासणीसाठी कसे गेले होते

हिंगोली तालुक्यातील पांगरी येथे स्वस्त धान्य दुकानाच्या चौकशी करण्यासाठी गेलेल्या तहसील कार्यालयाच्या नायब तहसीलदाराची व्हिडीओ क्लिप व्हायरल झाली आहे. यावरून उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे यांनी संबंधीत नायब तहसीलदारास सोमवारी कारणे दाखवा नोटीस बजावली असून तातडीने खुलासा करण्याचे आदेश दिले आहेत.

हिंगोली तालुक्यातील पांगरी येथे स्वस्त धान्य दुकानाची चौकशी करण्यासाठी नायब तहसीलदार शिवाजी खोकले हे रविवारी सकाळी गेले होते. मात्र त्या ठिकाणी गावकऱ्यांनीच त्यांच्या प्रश्‍नावर भडीमार केला. गावकरी संतप्त होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर तहसीलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने गावात भेट देऊन खोकले यांना सोबत आणले. यावेळी काही गावकऱ्यांनी व्हिडीओ क्लिप तयार केली आहे. यामध्ये खोकले हे मद्यधुंद अवस्थेत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

या संदर्भातील व्हिडीओ क्लिप आज व्हायरल करण्यात आली. सदर क्लिप महसुल विभागाच्या अधिकाऱ्यांच्या व्हॅाटस्‌अप वर पाठविण्यात आली होता. आज सायंकाळी सदर क्लिप बघितल्यानंतर उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे यांनी नायब तहसीलदार खोकले यांना कारणे दाखवा नोटीस बजावली असून या व्हिडीओ क्लिप बद्दल तातडीने खुलासा सादर करण्याच्या सुचना दिल्या आहेत.

दरम्यान, रविवारी तहसील कार्यालयाचे अधिकारी दुकान तपासणीसाठी कसे गेले होते, दुकान तपासणीचे आदेश होते काय असे प्रश्‍नही आता उपस्थित केले जात आहेत. त्यामुळे आता महसुल विभागाच्या अधिकाऱ्यांनी याबाजूने देखील चौकशी करण्यास सुरवात केल्याचे विश्‍वसनीय सुत्रांनी सांगितले. याबाबत नायब तहसीलदार यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. तर या संदर्भात उपविभागीय अधिकारी चोरमारे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी खुलासा मागविल्याचे स्पष्ट केले आहे. नायब तहसीलदारांचा खुलासा प्राप्त झाल्यानंतरच पुढील निर्णय घेतला जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

बातम्या आणखी आहेत...