आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हिंगोली:हिवरा येथे चेक पोस्टवर गैरहजर असलेल्या अधिकाऱ्यांना चोविस तासात खुलासा करण्याचे आदेश

हिंगोलीएका वर्षापूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • जिल्ह्यांमध्ये बाहेर जिल्ह्यातून येणाऱ्या नागरिकांना रोखण्यासाठी दहा ठिकाणी पोस्ट उभे करण्यात आले आहेत

कळमनुरी तालुक्यातील हिवरा येथील चेक पोस्टवर गैरहजर असलेल्या तीन अधिकाऱ्यांना शुक्रवारी कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली असून चोविस तासात खुलासा करण्याचे आदेश उपविभागीय अधिकारी प्रशांत खेडेकर यांनी दिले आहेत.

हिंगोली जिल्ह्यांमध्ये बाहेर जिल्ह्यातून येणाऱ्या नागरिकांना रोखण्यासाठी दहा ठिकाणी पोस्ट उभे करण्यात आले आहेत. याठिकाणी पोलिस कर्मचार्‍यांसह आरोग्य विभाग तसेच महसूल व शिक्षण विभागाचे कर्मचारी तैनात करण्यात आले.  या सर्व कर्मचाऱ्यांनी त्यांना दिलेल्या वेळेत कर्तव्यावर हजर राहण्याच्या सूचना  जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी यांनी दिल्या आहेत. या चेकपोस्ट वरून येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांची नोंद करून घेत वाहनातील प्रवाशांची माहिती नोंदवून घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

कळमनुरी तालुक्यातील हिवरा येथील चेकपोस्टची तपासणी करण्याच्या सूचना उपविभागीय अधिकारी प्रशांत खेडेकर यांनी दिल्या होत्या. त्यानुसार कळमनुरी तहसीलदार कैलासचंद्र वाघमारे यांनी गुरुवारी ता. १६ रात्री साडेअकरा वाजता हिवरा येथील चेकपोस्टला भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्या ठिकाणी केवळ पोलिस कर्मचारी हजर होते. त्या ठिकाणी नियुक्त केलेले पोतरा येथील वैद्यकीय अधिकारी डॉ.मदन गारोळे, कळमनुरी पंचायत समितीचे विस्तार अधिकारी एस. एस. जगताप, कृषी सहाय्यक एस. एस. घोंगडे हे गैरहजर असल्याचे आढळून आले. याबाबतचा अहवाल तहसीलदार श्री वाघमारे यांनी उपविभागीय अधिकारी प्रशांत खेडेकर यांच्याकडे सादर केला. त्यावरून आज वरील तिघांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली असून चोवीस तासात खुलासा करण्याचे आदेश खेडेकर यांनी दिले आहेत

बातम्या आणखी आहेत...