आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

क्रूर चेष्टा:उत्तर प्रदेशकडे निघालेली श्रमिक एक्स्प्रेस अवघ्या दहा मिनिटांनी हुकली, 42 मजुरांची हेळसांड

औरंगाबादएका वर्षापूर्वीलेखक: प्रवीण पवार
  • कॉपी लिंक
  • नांदेड-औरंगाबाद प्रशासनामधील विसंवादाने 42 मजुरांची हेळसांड

सतीश वैराळकर 

उत्तर प्रदेशातील बस्ती जिल्ह्याकडे औरंगाबाद येथून जाणारी श्रमिक एक्सप्रेस गाठण्यासाठी नांदेडहून निघालेल्या मजुरांची ही १० मिनिटांनी रेल्वे हुकली. दोन जिल्ह्यांमधील प्रशासनाच्या विसंवादामुळे या मजुरांची हेळसांड झाली. रेल्वे सुटण्यास पाच तासांपेक्षाही कमी कालावधी असताना बेचाळीस श्रमिकांना नांदेडहून दोन बसद्वारे औरंगाबादला पाठवण्यात आले. परिणामी औरंगाबादला पोहोचण्यापूर्वीच दहा मिनिटे आधी रेल्वे निघून गेली. या सर्वांना आल्यापावली परत नांदेडला बोलावून घेण्यात आले. सायंकाळी ५ वाजता ही रेल्वे निघणार होती. 

यासाठी सकाळी ९ ते १० वाजता नांदेडहून निघणे अपेक्षित होते. परंतु तेथील प्रशासनाने त्यांना दुपारी १२.१५ वाजता बसमध्ये बसवले. मात्र बस औरंगाबाद स्थानकावर आल्या तेव्हा गाडी दौलताबाद स्थानकाच्या पुढे गेली होती. चालकांनी विचारले असता विशेष रेल्वे व्यवस्थापक लक्ष्मीकांत जाखडे यांनी रेल्वे थांबवणे अशक्य असल्याचे सांगितले. रेल्वे सुरक्षा दलाचे पोलिस निरीक्षक अरविंद शर्मा यांनीही मजूर येणार असल्याचे माहिती असते तर रेल्वे थांबवता आली असती, असे या चालकांना सांगितले.

बातम्या आणखी आहेत...