आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिबिर:धम्मभूमी बुद्धलेणी येथे 26 पासून श्रामणेर शिबिर

औरंगाबाद10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सालाबादप्रमाणे धम्मभूमी बुद्धलेणी येथे धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनानिमित्त भदंत विशुद्धानंद बोधी महाथेरो यांच्या मार्गदर्शनाखाली श्रामणेर शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. २६ सप्टेंबरपासून शिबिरास सुरुवात होईल. ६ ऑक्टोबर रोजी शिबिराचा समारोप होईल. यात १४ वर्षांपुढील व्यक्तीस प्रवेश असेल.

सहभागी होऊ इच्छिणाऱ्याने मुंडण करून दैनंदिन गरजेच्या वस्तू सोबत आणाव्यात. शिबिरामध्ये त्रिसरण-पंचशील, अष्टशील, परित्राण पाठ, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या २२ प्रतिज्ञा, भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म याचे पठण करण्यात येईल. समाजामध्ये जबाबदार नागरिक म्हणून जडणघडण व्हावी, महापुरुषांच्या विचारांचा प्रभाव टाकण्यासाठी भिक्खू संघ, धार्मिक, साहित्य क्षेत्रातील मान्यवर मार्गदर्शनही करतील. लाभ घ्यावा, असे आवाहन भिक्खू नागसेन बोधी (थेरो), भंते उपाली, भंते बोधिधम्म, भंते आनंद, दादाराव सोनटक्के यांनी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...