आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वसंत पंचमी:छत्रपती क्रीडा मैदानावर आज श्री सरस्वती पूजनोत्सव

औरंगाबाद8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मिथिला सेवा संस्थान समितीच्या वतीने २६ जानेवारी रोजी वसंत पंचमीच्या निमित्ताने श्री सरस्वती पूजनोत्सव साजरा करण्यात येणार आहे. मिथिला सेवा संस्थानच्या वतीने संत ज्ञानेश विद्या मंदिरजवळील छत्रपती क्रीडा मैदान येथे सरस्वती पूजनोत्सव होणार आहे. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून सहकारमंत्री अतुल सावे यांच्यासह माजी खासदार चंद्रकांत खैरे, माजी महापौर नंदकुमार घोडेले आदींची उपस्थिती राहणार आहे. गुरुवारी सकाळी ९ वाजता पूजेला सुरुवात होऊन दुपारी १ वाजता महाप्रसाद होईल. सायंकाळी ६.३० वाजता आरती, सायंकाळी ५ वाजता सांस्कृतिक कार्यक्रम व २७ तारखेला प्रतिमा विसर्जन होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...