आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्य आंतरजिल्हा महिला फुटबॉल:श्रेयाची हॅट‌्ट्रिक; औरंगाबादची झुंज अपयशी

औरंगाबाद16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबादच्या गुणवंत युवा फुटबॉलपटू श्रेया इंगाेलेने साेमवारी पालघर येथे आयाेजित राज्यस्तरीय आंतरजिल्हा महिला फुटबॉल स्पर्धेचा सलामी सामना गाजवला. तिने स्पर्धेत भंडाराविरुद्ध सलामी सामन्यात सर्वाेत्तम खेळीतून गाेलची हॅट‌्ट्रिक साजरी केली. मात्र, औरंगाबाद टीमची यादरम्यानची झुंज अपयशी ठरली. भंडारा संघाने सरस खेळी करत सलामी सामना जिंकला. भंडारा संघाने पहिल्या फेरीत औरंगाबादवर ४-३ ने मात केली. अवघ्या एका गाेलच्या आघाडीवर भंडारा संघाला राेमहर्षक विजय साकारता आला. यादरम्यान औरंगाबादच्या श्रेयाने एकटीने सामन्यात तीन गाेल केले. इतर खेळाडूंना शेवटच्या मिनिटापर्यंत एकही गाेल करता आला नाही. सायलीच्या नेतृत्वात औरंगाबाद महिला फुटबॉल संघ या स्पर्धेत सहभागी झाला हाेता. वेस्टर्न इंडिया फुटबॉल संघटनेतर्फे या स्पर्धेचे आयाेजन करण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...