आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबादेत श्रीगुरुजी पुरस्कार सोहळ्याचे 12 फेब्रुवारीला आयोजन:सत्कारमूर्तींना 1 लाखांचे पुरस्कार; गाेर्वधन अग्रवाल यांची माहिती

औरंगाबाद22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समितीच्यावतीने राष्ट्रीय पातळीवर देण्यात येणाऱ्या श्रीगुरुजी पुरस्कार सोहळ्याचे आयोजन यंदा पहिल्यांदाच औरंगाबादेत होणार आहे.

त्यात हिमाचल प्रदेशातील पद्मश्री डॉ. क्षमाजी मेत्रे यांना महिला सबलीकरणासाठी ​​​​​​,​तर पर्यावरण संवर्धनातील योगदानाबद्दल अमूल संस्थेला पुरस्कार देण्यात येणार आहे. एक लाख रुपये रोख, शाल व श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. हा सोहळा 12 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 5.30 वा. ‘वंदे मातरम’ सहभागृहात होणार आहे.

याविषयीची माहिती समितीचे महाराष्ट्र अध्यक्ष डॉ. रविंद्र साताळकर आणि औरंगाबादचे अध्यक्ष गाेर्वधन अग्रवाल यांनी पत्रकार परिषदेत दिली.

अग्रवाल म्हणाले, राष्ट्रजीवनाच्या विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्थांना रा. स्व. संघ जनकल्याण समितीच्या वतीने, दरवर्षी राष्ट्रीय पातळीवरील श्री गुरुजी पुरस्कार दिला जातो. महिला सबलीकरण व पर्यावरण या क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या संस्थांची निवड यासाठी केली जाते. या पुरस्कार सोहळ्यासाठी प्रमुख अतिथी म्हणून चैतन्य महाराज देगलूरकर आणि प्रमुख वक्ता म्हणून पुनरुत्थान विद्यापीठ अहमदाबादच्या(गुजरात) कुलपती इंदुमतीताई काटदरे उपस्थित राहणार आहेत.

डाॅ. साताळकर म्हणाले, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे द्वितीय सरसंघचालक स्व. माधव सदाशिव गोळवलकर आणि श्री गुरुजी यांच्या जन्मदिनी हा हा पुरस्कार देण्यात येतो. 1996 पासून पुरस्कार देण्यास सुरुवात झाली आहे.

डॉ. मेत्रे यांना चिन्मय ऑर्गनायझेशन फॉर रुरल डेव्हलपमेंट (CORD) च्या माध्यमातून देशातील 6 राज्यांमध्ये तसेच श्रीलंका व अमेरिकेतही त्यांचे काम 35 वर्षांपासून सुरू आहे.

पर्यावरणासाठी योगदान दिलेल्या अमूल दुग्ध पदार्थ निर्माण करणाऱ्या खेडा जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ लि. आणंद (गुजरात) या संस्थेची निवड करण्यात आली आहे. या संस्थेशी जोडल्या गेलेल्या 36 लाख शेतकऱ्यांमार्फत पर्यावरण संवर्धनाचे व्यापक कार्य सुरू आहे.

बातम्या आणखी आहेत...