आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
शिर्डीतील श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी मंदिर परिसरात प्रवेशासंदर्भातील नियमावलीची अंमलबजावणी सुरू केली असून या अटी जाचक असल्याचा दावा करत हायकोर्टात त्याविरोधात याचिका दाखल करण्यात आली आहे. न्या. एस. व्ही. गंगापूरवाला व न्या. एस. डी. कुलकर्णी यांच्या खंडपीठाने राज्य शासन व साई संस्थानला नोटीस बजावली. याचिकेवर ५ मार्च रोजी पुढील सुनावणी अपेक्षित आहे.
याचिकेानुसार, नियमावलीआधारे, फक्त २ पत्रकार/ वृत्तवाहिनी प्रतिनिधींनाच मंदिर परिसरात प्रवेश मिळेल. त्यांना ३० मिनिटांच्या वर परिसरात थांबता येणार नाही. वृत्तांकन, चित्रीकरण करण्यासाठीची जागा साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थाचे मुख्य कार्यकारी अधिकारी ठरवतील. अतिमहत्त्वाच्या व्यक्ती, मान्यवर इत्यादींचे छायाचित्र, चलचित्र(व्हिडिओ रेकॉर्डिंग) संस्थानतर्फे दिले जातील. पण मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी नियमावलीची अंमलबजावणी सुरू केली आहे. या अटी जाचक असल्याचा आरोप करत शिर्डी येथील प्रेस क्लबने त्याविरोधात निवेदन दिले. मात्र त्याची दखल घेण्यात आली नाही. त्या नाराजीने पत्रकार माधव ओझा यांनी ही याचिका दाखल केली आहे. अॅड. प्रज्ञा तळेकर आणि अॅड. अजिंक्य काळे यांनी त्यांची बाजू मांडली. शासनाच्या वतीने अॅड. एस. जी. कार्लेकर यांनी काम पाहिले.
प्रधान जिल्हा न्यायाधीशांची तदर्थ समिती गठित
हायकोर्टाने नवीन विश्वस्त नियुक्त करेपर्यंत प्रधान जिल्हा न्यायाधीश अहमदनगर, साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी, अतिरिक्त विभागीय आयुक्त, नाशिक व सहधर्मादाय आयुक्त, अहमदनगर यांची तदर्थ समिती गठित केली आहे. समितीने १९ डिसेंबर २०२० रोजी पत्रकारांना मंदिर परिसरात प्रवेशासंदर्भात नियमावली तयार केली आहे. त्याला परवानगी मिळण्यासाठी औरंगाबाद खंडपीठात दिवाणी अर्जही दाखल केला आहे. हा अर्ज प्रलंबित आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.