आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पारायण:श्रीमद् ग्रंथराज दासबोध पारायण‎ सोहळा; ग्रंथराज दासबोध पारायण सोहळा‎ जांब येथे उत्साहात साजरा‎

औरंगाबाद12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद‎ येथील श्री समर्थ रामदास स्वामी‎ प्रतिष्ठानच्या वतीने गेल्या २० वर्षांपासून‎ श्री समर्थ रामदास स्वामी यांचे जन्मगाव‎ असलेल्या श्रीक्षेत्र जांब (जि. जालना)‎ येथे श्रीमद् ग्रंथराज दासबोध पारायण‎ सोहळा साजरा केला जातो. कोरोनामुळे‎ गेल्या दोन वर्षांत हा कार्यक्रम झाला‎ नव्हता, मात्र या वर्षी नुकताच हा‎ कार्यक्रम झाला. त्याला औरंगाबादसह‎ मराठवाड्यातील भाविकांनी मोठ्या‎ संख्येने उपस्थिती लावली, अशी माहिती‎ प्रतिष्ठानचे प्रमुख गिरीश सातोनकर यांनी‎ दिली.

दासबोध पारायणासह दररोज‎ प्रभातफेरी, कीर्तन, संगीत प्रवचन,‎ शास्त्रीय संगीत गायन, भजन, अभ्यास‎ वर्ग आदी कार्यक्रमही घेण्यात आले. संत‎ सखाराम महाराज संस्थान अमळनेरचे‎ श्री प्रसाद महाराज यांनीही सोहळ्यात‎ येऊन भाविकांना मार्गदर्शन केले. मनोहर‎ महाराज मुंढे डाबीकर (परळी) यांचे‎ संगीत प्रवचन, कीर्तन, सखाराम बोरूळ‎ (जालना) यांचे सतारवादन,‎ सुवर्णमाला कुलकर्णी, डॉ. शरयू‎ खेकाळे, डॉ. सीमा दडके (सेलू) यांचे‎ गीतगायन झाले.

दौलतराम महाराज‎ कंद्राप यांनी ‘श्री समर्थ कथा’सादर‎ केली. शंतनू महाराज पाठक वालूर‎ यांच्या काल्याच्या कीर्तनाने उत्सवाची‎ सांगता झाली. गिरीश साताेनकर यांच्या‎ पुढाकाराने झालेल्या या उत्सवाच्या‎ यशस्वितेसाठी बाबा महाराज मोगरे,‎ मुंजाबा तांगडे, सचिन जोशी, जगन‎ देवकर, बापूसाहेब शिरूरकर, स्वाती व‎ विवेक चिक्षे, प्रांजळ चिक्षे, सुधाकरराव‎ कुलकर्णी भोगलगावकर, प्रसाद पाटील,‎ जयश्री सातोनकर यांनी योगदान दिले.‎

बातम्या आणखी आहेत...