आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आई-मुलगी स्पर्धा:आदर्श आई-मुलगी स्पर्धेत श्रुती-अवनी राठी प्रथम, पूजा द्वितीय

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

आई आपल्यावर प्रेम करणारी आणि जिवापाड जीव लावणारी एक ममताची मूर्ती आहे. एवढेच नव्हे तर आपली पहिली गुरू ही आईच आहे, असे मत मुलींनी आईबद्दल व्यक्त केले. महेश नवमीनिमित्त सोमवारी खडकेश्वर मंदिराच्या प्रांगणात श्री माहेश्वरी मंडळाच्या अंतर्गत नई दिशाए महिला मंडळाच्या वतीने आदर्श आई-मुलगी स्पर्धा घेण्यात आली. त्या वेळी मुलींनी आपले विचार मांडले. या स्पर्धेत श्रुती राठी (आई), अवनी राठी (मुलगी) प्रथम, तर द्वितीय स्थानी पूजा झंवर (आई), रुतवी झंवर (मुलगी) यांनी बाजी मारली. या स्पर्धेत सुरुवातीला आई आणि मुलीची माहिती आणि त्यांच्यातील टॅलेंट याची ओळख करून देण्यात आली. या वेळी आपल्या आईबद्दल विचार मांडताना मुलींनी आपल्या आईला पहिली गुरू मानले, तर काहींनी आईच्या प्रेमाला वात्सल्याची मूर्ती मानले. एवढेच नव्हे तर स्पर्धेत आईने स्वतःची ओळख करून दिली. तिला मुलीबद्दल काय वाटते याची माहिती दिली. मुलीला आपल्या आईच्या आवडीनिवडीबद्दल प्रश्न विचारले. यात मुलीला नृत्य, गायनाची आवड असेल तर तीच आवड आईलासुद्धा असल्याचे समोर आले. यातून आई-मुलीच्या एकमेकींविषयीच्या अतूट नात्याची ओळख झाली. या स्पर्धेत एकूण दहा स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. १० वयोगटावरील स्पर्धेत मनीषा लड्डा (आई), गुंजन लड्डा (मुलगी) यांनी प्रथम, तर द्वितीय विजया मालाणी (आई), गौरी मालाणी (मुलगी) यांनी मिळवला. स्पर्धेचे परीक्षण प्रमिला चांडक, रेखा राठी यांनी केले. या वेळी नई दिशाए महिला मंडळाच्या अध्यक्षा शिवानी लड्डा, सचिव कविता बाहेती, प्रकल्पप्रमुख स्वाती मुंदडा, सुचिता झंवर, सुमित्रा हेडा, पुष्पा लड्डा, मीना सोनी, सुषमा बजाज, संगीता राठी, सतीश लड्डा, बजरंग नावंदर यांची उपस्थिती होती. मेधा धुप्पड यांनी सूत्रसंचालन केले. स्नेहल बजाज, पायल बजाज यांनी आभार मानले.

बातम्या आणखी आहेत...