आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:सिद्धचक्र महामंडळ विधानाची होमहवनाने सांगता; आर्यनंदी कॉलनीत दिगंबर जैन मंदिरात आठ दिवसांपासून धार्मिक कार्यक्रम

औरंगाबाद3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

दिगंबर जैन मंदिर आर्यनंदी कॉलनी, वेदांतनगर येथे आठदिवसीय सिद्धचक्र विधानाची होमहवनाने सांगता झाली. सर्वप्रथम सकाळी मंदिरात भगवान चंद्रप्रभू यांचा पंचामृत अभिषेक करण्यात आला. या वेळी इंद्र-इंद्राणी बनण्याचे सौभाग्य ज्योती हुकूमचंद चांदीवाल यांना मिळाले. कुबेर इंद्र म्हणून डॉली अमित अजमेरा यांना मान मिळाला होता.

या वेळी ९ हवनकुंड तयार केले होते. सिद्धचक्र विधानासाठी मोहनलाल सोनी यांचे सहकार्य लाभले. आठ दिवस दररोज जिनेंद्र भगवंतांची तसेच सिद्ध परमेश्वराची पूजा झाली. संध्याकाळी आरती, शास्त्रवाचनाने कार्यक्रमाची सांगता झाली. पूजनामध्ये भगवंताला २०२४ श्रीफळ व अर्ग अर्पण करण्यात आले. सिद्धचक्र विधान सांगतेच्या दुसऱ्या दिवशी आचार्य गुप्तनंदी गुरुदेव यांचे आर्यनंदी कॉलनीत आगमन झाले. या वेळी त्यांनी विधान केल्याने मनुष्याला सुख, शांती, संपदा व निरोगी शरीराची प्राप्ती होते, असे सांगितले.

सिद्धचक्र विधानासाठी पंडित प्रवीण काळे यांनी मंत्रोपचार केले. सुमीत खेडकर यांनी विधानाचे पठण केले. विधान यशस्वी करण्यासाठी विजय अजमेरा, दिनेश सेठी, संदीप ठोले, हुकूमचंद चांदीवाल, महावीर सेठी, भागचंदजी विनायके, संजय पापडीवाल, अरुण पाटणी, श्रीपाल पाटणी, दिनेश अन्नदाते, भरत ठोले, जितेंद्र अजमेरा, अमित अजमेरा, आनंद सेठी, रवी बिनायके, प्रशांत बिनायके, संजय पहाडे, अजय जैन, अजय कासलीवाल, सुशील गंगवाल, पंकज पहाडे, राजेंद्र सेठी, अजय पाटणी, योगेश लोहाडे, अनुप पाटणी, राकेश बडजाते, श्रेणिक कासलीवाल, पारस पांडे, पीयूष कासलीवाल, भूषण जैन, तुषार अजमेरा, शिरीष पाटणी आदींनी सहकार्य केले.

बातम्या आणखी आहेत...