आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जनहित याचिका:सिडकोत अतिक्रमण काढण्याच्या मोहिमेला आजपासून सुरुवात

छत्रपती संभाजीनगर25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या आदेशानुसार महापालिकेतर्फे गुरुवारपासून (२ मार्च) सिडको भागात अतिक्रमण हटाव मोहीम राबवली जाणार आहे. यासंदर्भात उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात सुमोटो जनहित याचिका दाखल झाली आहे. उच्च न्यायालयाने अतिक्रमणे हटवण्याचे आदेश महापालिकेला दिले. त्याचे पालन करण्यासाठी पालिकेचे प्रशासक डॉ. अभिजित चौधरी यांनी सिडको एन-१ ते एन-१३ आणि टाऊन सेंटर या परिसरासाठी प्रत्येकी एका अधिकाऱ्याची नियुक्ती केली. गुरुवारपासून सुरू होणाऱ्या मोहिमेत रस्ते, फुटपाथ, खुल्या जागा, ॲमिनिटी स्पेस, हरितपट्टे, उद्याने, सार्वजनिक वापराच्या जागेवरील पक्की-तात्पुरती अतिक्रमणे, अनधिकृत स्टॉल्स, शेड्स, टपऱ्या हटवण्यात येतील असे महापालिकेने कळविले आहे.

बातम्या आणखी आहेत...