आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागेल्या अनेक दिवसांपासून कट्टरवादी शक्तीकडून हिंदूंच्या सातत्याने हत्या करण्यात येत आहे. उदयपूर, अमरावती तसेच देशातील विविध भागांत हत्यांचे सत्र सुरू आहे. याविरोधात सकल हिंदू समाजातर्फे रविवारी (२४ जुलै) शहरात मूक मोर्चा काढण्यात आला.
शिस्तीत व शांततेत हा मोर्चा पैठण गेटपासून सुरू होऊन गुलमंडीमार्गे महात्मा फुले चौक येथे पोहोचला. पावसाताही मोठ्या संख्येने नागरिक तसेच विविध संस्था, संघटना, राजकीय पक्ष, समाज, पंथ, गणेश मंडळेही मोर्चात सहभागी झाली होती. या वेळी दंडावर काळ्या फिती बांधून निषेधही व्यक्त करण्यात आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानानुसार राष्ट्र चालावे यासाठी मोर्चात विविध फलक झळकले होते. तसेच हाती भगवे ध्वज, मस्तकी टिळा व डोक्यावर भगव्या टोप्या घालून हिंदू समाज मोर्चात सहभागही झाला. महिला आणि तरुणांचा सहभाग लक्षणीय होता. मोर्चाचा शेवट महात्मा फुले पुतळ्याजवळ संत-महात्म्यांच्या दर्शनाने झाला. शांतिमंत्राने मार्गदर्शनाची सुरुवात झाली. विश्वशांतीसाठी पसायदान म्हणण्यात आले. या वेळी सरदार खडकसिंग ग्रंथी, सुदर्शन कपाटे महाराज, नवनाथ महाराज आंधळे, जनार्दन महाराज मेटे, संजयअप्पा बारगजे आदींनी मार्गदर्शन केले.
औरंगाबादचे ‘छत्रपती संभाजीनगर’ नामांतरामुळे आनंद
औरंगाबाद शहराचे छत्रपती संभाजीनगर नामांतराचा प्रस्ताव मंत्रिमंडळाने पारित केल्यामुळेच संत-महंतांनी आनंद व्यक्त केला. शासनस्तरावरील उर्वरित प्रक्रिया पूर्ण करण्यात यावी अशी इच्छा व्यक्त केली गेली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.