आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासिल्लोडमधील डोंगरगाव फाट्याजवळ 28 वर्षीय तरुणाचा चाकूने भोसकून खून केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली आहे. संतोष जादुसींग बामनावत रा. वांजोळा असे मृत तरुणाचे नाव आहे.
वाढदिवसाची पार्टी करण्यासाठी बाहेर जात असल्याचे सांगून संतोष घराबाहेर पडला होता. मात्र आज सकाळी त्याचा अंगावर चाकूने वार केल्याचा जखमा असलेला मृतदेह सापडला. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
नेमकी घटना काय?
डोंगरगाव फाट्याजवळ काही नागरिकांना एक तरुण जखमी अवस्थेत असल्याचे आढळून आले. यावेळी त्यांच्या अंगावर धारदार शस्त्राने वार केल्याच्या अनेक जखमा दिसून आल्या. यावेळी उपस्थित नागरिकांनी त्याला जवळील रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून तयास मृत घोषित केले. तरुणाचा काही अज्ञात व्यक्तींनी खून केल्याबाबतचा आरोप त्याच्या नातेवाईकांनी केला असून या संदर्भात ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सीताराम मेहत्रे यांनी सहकार्यांसह तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन या घटनेबाबत कसून चौकशी सुरू केली आहे. उपजिल्हा रुग्णालयात मृत तरुणाचे वांजोळा येथील नातेवाईक मोठ्या संख्येने जमा झाले होते. दुपारपर्यंत शवविच्छेदन करण्यात आले नव्हते.
वाढदिवस ठरला शेवटचा
मृत संतोष याचा काल शुक्रवार रोजी वाढदिवस होता. त्या वाढदिवसानिमित्त तो काही मित्रांसोबत डोंगरगाव फाट्यावर एका हॉटेलवर जेवणासाठी गेला होता. यादरम्यानच त्याचा घात झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्याचा वाढदिवस त्याचा मरण दिवस ठरल्याने या घटनेची सखोल चौकशी करण्याची मागणी संतोष याचा नातेवाईकांनी केली आहे. दरम्यान या खुनाच्या घटनेमुळे सिल्लोड शहरात खळबळ उडाली असून लवकरच या घटनेतील आरोपी गजाआड करण्यात येतील असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.