आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धक्कादायक!:सिल्लोड घाटनांद्रा येथे दुचाकीचा अपघात; मोटार सायकलस्वारचा झाडावर आदळून मृत्यू

सिल्लोडएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

सिल्लोड घाटनांद्रा रस्त्यावर शिंदेफळ फाट्याजवळ मोटार सायकलस्वार झाडावर आदळल्याने जागीच ठार झाला आहे. सदरील अपघाताची घटना शुक्रवार रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास घडली आहे. या अपघाताची अधिक माहिती अशी की सिल्लोड शहरातील काही युवक तीन मोटारसायकली घेऊन फिरण्यासाठी सिल्लोडहून घाटनांद्राकडे जात असताना एका युवकाची यामाहा मोटर सायकल शिंदेफळ फाट्यापासून पुढे निघाल्यानंतर रस्त्याच्या कडेला असणाऱ्या झाडावर आदळली.

यामुळे मोटरसायकल वरील तन्वीर खान जमील खान ( वय 20) राहणार शाहूनगर सिल्लोड या युवकाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर त्याच्या पाठीमागे बसलेल्या फैजान खान शाकीर खान (वय 19) हा जखमी झाला आहे. सदरील अपघाताची सिल्लोड ग्रामीण पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली असून, पोलिस निरीक्षक सिताराम मेहेत्रे यांचे मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

बातम्या आणखी आहेत...