आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी एक्सक्लूझिव्हसत्तारांच्या कन्येला 2017 पासून पगार:'टीईटी' अपात्र ठरूनही महिना 55,000 रुपये वेतन; प्राथमिक शिक्षण विभागाची माहिती

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

टीईटी घोटाळ्यात माजी मंत्री अब्दुल सत्तारांच्या मुलींचे नाव समोर आल्यानंतर आता आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. अब्दुल सत्तार यांच्या शेख हिना कौसर या मुलीला 2017 पासून ते आजतागायत जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून पगार मिळत असल्याचे समोर आले आहे. सत्तार यांच्या दाव्यानुसार त्यांच्या मुली 2019च्या टीईटी परीक्षेत अपात्र ठरल्या होत्या. मग अपात्र असतांना त्यांना पगार कसा काय दिला जातो, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

2014 पासून सेवेत

शिक्षण विभागाकडे असलेल्या कागदपत्रांनुसार, हिना कौसर अब्दुल सत्तार शेख 1 ऑक्टोबर 2014 रोजी नॅशनल उर्दू प्राथमिक शाळेत रुजू झाल्या. त्यांच्या वेतनाबाबत 31 ऑगस्ट, 2017 रोजी शिक्षण विभागाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला. तो मंजूरही झाला. त्यानंतर हाच प्रस्ताव पुढे कायम ठेवण्यात आला. त्यानुसार हिना कौसर यांनी 2017 पासून ते जुलै 2022 पर्यंत पगार उचलला आहे. महिना 55,000 हजार रुपये त्यांचा पगार आहे.

मात्र, अब्दुल सत्तार यांच्या दाव्यानुसार त्यांच्या मुली टीईटी अपात्र आहेत. मग हिना कौसर कुठल्या निकषावर पगार उचलतात या प्रश्नासोबतच सत्तार यांनी केलेला दावाच कितपत खरा आहे, हासुद्धा प्रश्न उपस्थित झाला आहे. दरम्यान, अब्दुल सत्तार यांची दुसरी शेख उजमा नाहीद शेख अब्दुल सत्तार हिचेदेखील टीईटी अपात्रतेंच्या यादीत नाव असल्याचे स्पष्ट झाले आहे.

कागदपत्रांमध्ये मुली पात्र

जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षण विभागाचे वेतन अधीक्षक दिलीप जेऊळकर यांनी याबाबत सांगितले की, हिना कौसर ज्या शाळेत रुजू आहेत, त्या शाळेने सादर केलेल्या वेतन बिलामध्ये हिना कौसर पूर्णतः पात्र असल्याचं दाखवण्यात आले आहे. त्यामुळे त्यांचा पगार सुरू आहे. तसेच, शिक्षण उपसंचालक कार्यालयातून पात्रता निकष पडताळणी केली जाते. त्यानुसार आमच्या कार्यालयातून पगार पत्रक निघतात, असेही शिक्षण विभागातर्फे सांगण्यात आले आहे.

त्यामुळे सत्तार यांच्या दाव्यानुसार त्यांच्या मुली टीईटी अपात्र आहेत की, शिक्षण विभागाने सांगितल्यानुसार मुली पात्र आहे, यावरच संभ्रम निर्माण झाला आहे.

न्यायालयाच्या आदेशाने वेतन

प्राथमिक उपशिक्षणाधिकारी सचिन सोळंकी यांनी सांगितले की, शेख हिना कौसर अब्दुल सत्तार यांना १ ऑक्टोंबर २०१४ ला तीन वर्षांसाठी प्रथम मान्यता देण्यात आली होती. त्यानंतर तीन वर्षासाठी पुन्हा १६ मे २०१५ मध्ये शिक्षण सेवक म्हणून मान्यता देण्यात आली. जी ३१ ऑक्टोंबर २०१७ मध्ये नियमित केली. २०१८ पासून टीईटी करण्यात आली. हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने न्यायालयाने त्यांचे वेतन थांबवू नये असे म्हटल्याने त्यांचे वेतन सुरु आहे.

शेख हिना कौसर यांना शिक्षण विभागाकडून मिळणारे पगारपत्र (Pay Bill)
शेख हिना कौसर यांना शिक्षण विभागाकडून मिळणारे पगारपत्र (Pay Bill)

एका मुलीचे वेतन सुरू नाही

प्राथमिक शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण या पुण्याला प्रशिक्षणासाठी गेल्या आहेत. त्यामुळे उपशिक्षणाधिकारी यांनी माहिती दिली की, यादीत नाव असलेल्यांपैकी अब्दुल सत्तार यांची मुलगी शेख हुमा फरदीन शेख अब्दुल सत्तार यांना संस्थेने २५ मार्च २०१९ मध्ये नियुक्ती दिली होती. त्याचा प्रस्ताव संस्थेने ९ डिसेंबर २०१९ रोजी शिक्षण विभागात सादर केला. मात्र त्या टीईटी पात्र नसल्याने २१ जानेवारी २०२० रोजी शिक्षण विभागाने त्यांचा प्रस्ताव नाकारला त्यांचे वेतन सुरु नाही.

सुरुवातीला माहिती देण्यास टाळाटाळ

दरम्यान, माध्यमांचे प्रतिनिधी शिक्षण विभागातून किती शिक्षकांचे वेतन थांबवले आहे. किती जण अपात्र ठरले आहेत. अब्दुल सत्तार यांच्या मुलांची नावे यादीत आहेत की नाही, याची माहिती घेण्यासाठी सकाळी १० वाजेपासून विभागात आले होते. मात्र, प्राथमिक शिक्षण विभाग, कधी माध्यमिक शिक्षण विभाग आणि शिक्षण उपसंचालक कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी एकमेकांकडे बोट दाखवत होते. तर, वेतन अधीक्षक विभागातूनही माहिती देण्यास विलंब लावला जात होता.

शिक्षण विभागाची सारवा सारव

सायंकाळी शिक्षण उपसंचालक कार्यालयाच्या वतीने नॅशनल एज्युकेशन सोसायटी, सिल्लोड किंवा शेख हिना कौसर अब्दुल सत्तार आणि शेख उजमा नाहीद शेख यांनी टीईटीचे कोणते प्रमाणपत्र दिलेले आहे. तसेच, कोणते लाभ घेतलेले आहे. त्याबाबतचा लेखी खुलासा करावा, असे पत्र शिक्षण उपसंचालकांच्या नावाने देण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...