आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कृषी महोत्सव:सिल्लोडला 1 जानेवारीपासून राज्यस्तरीय कृषी महोत्सव, कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या पुढाकाराने आयोजन

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या पुढाकाराने त्यांच्या वाढदिवशी म्हणजे १ जानेवारीपासून सिल्लोड येथे राज्यस्तरीय कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. पाच जानेवारीपर्यंत हा महोत्सव चालणार आहे. त्यात राज्यातील चारही कृषी विद्यापीठांचा सहभाग असेल, अशी माहिती सत्तार यांनी दिली. महोत्सवाच्या पूर्वतयारीसाठी त्यांनी सोमवारी तीन तास जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली. त्यानंतर कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांनी सांगितले की, महोत्सवात ३६० खासगी, २४० सरकारी स्टॉल असतील. आधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यापर्यंत पोहोचले जावे यासाठी हा महोत्सव आहे. सत्तार म्हणाले की, यात शेती आणि कृषीआधारित उद्योगांच्या संदर्भात विविध चर्चासत्रांचे आयोजनही करण्यात येणार आहे. राज्यस्तरीय तज्ज्ञ शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी येणार आहेत.

बातम्या आणखी आहेत...