आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खेलो इंडिया महिला ज्युदो लीग स्पर्धेत:औरंगाबादच्या श्रद्धा चोपडेला रौप्यपदक

औरंगाबाद25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली येथे पार पडलेल्या पहिल्या खेलो इंडिया महिला ज्युदो लीग स्पर्धेत औरंगाबादच्या श्रद्धा चोपडेने उत्कृष्ट कामगिरी करत रौप्यपदक आपल्या नावे केले. तिने ४८ किलो वजन गटात ही कामगिरी साधली. फेडरेशनचे व्यवस्थापक निवृत्ती न्यायमूर्ती पंकज नक्व यांच्या हस्ते सन्मानचिन्ह, रोख व पदक देऊन गौरवण्यात आले. तिला प्रशिक्षक यशपाल सोलंकी, मधुश्री काशीद, भीमराज रहाणे, अशोक जंगमे यांचे मार्गदर्शन लाभले. यापूर्वी तिन कनिष्ठ आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पदक जिंकले आहे. तिच्या यशाबद्दल जिल्हा ज्युदो संघटनेचे अध्यक्ष अजित मुळे, सचिव अतुल बामनोदकर, राज्य संघटनेचे सचिव शैलेश टिळक, तांत्रिक समितीचे दत्ता आफळे, योगेश धाडवे आदींनी अभिनंदन केले.

बातम्या आणखी आहेत...