आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एक्स्पर्ट ओपिनियन:इंग्रजीची भीती घालवणारे असेच प्रश्नपत्रिकेचे स्वरूप

छत्रपती संभाजीनगर22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या दहावीच्या लेखी परीक्षेला २ मार्चपासून प्रारंभ झाला आहे. विभागातील पाच जिल्ह्यांतून ६२९ केंद्रावर १ लाख ८०,२१० पेक्षा अधिक विद्यार्थी परीक्षा देत असून ६ मार्चला इंग्रजी भाषा विषयाचा पेपर होता. या पेपरची सर्वांना भीती वाटते. परंतु, यंदाचा इंग्रजीचा पेपर विद्यार्थ्यांची भीती दूर करणारा होता. सामान्य विद्यार्थ्यांना देखील चांगले गुण मिळतील असेच पेपरचे स्वरूप हाेते, अशी माहिती शहरातील इंग्रजी विषयाच्या शिक्षकांनी दिली.

पोएट्री, रायटिंग सेक्शनचे सर्व प्रश्नदेखील सोपे होते यंदा इंग्रजी भाषा विषयाच्या पेपरचे स्वरूप अतिशय सोपे होते. यंदा इंग्रजीच्या पेपरमध्ये विद्यार्थ्यांना वेळही अपुरा पडला नाही. यात पोएट्री सेक्शन, रायटिंग सेक्शनमधील प्रश्नदेखील सोपे होते. त्यामुळे सामान्य विद्यार्थीदेखील चांगले गुण घेऊन उत्तीर्ण हाेतील, अशी अपेक्षा आहे. - टी.एम. गरड

पोएट्रीमधील अॅप्रिसिएशनही सोपे इंग्रजी विषयाचा पेपर खूप सोपा होता. त्यात कोणतीही चूक आढळून अाली नाही. एरवी विद्यार्थ्यांना पोएट्री सेक्शनमध्ये विचारलेले अॅप्रिसिएशनवरील प्रश्न अवघड वाटतात. परंतु, यात सोप्या कविता विचारल्या होत्या. त्यामुळे सामान्य विद्यार्थ्यांनाही चांगले गुण मिळतील. -सुनीता जाधव

बातम्या आणखी आहेत...