आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रिक्त जागा:मंत्रीस्तरावर निर्णय नसल्याने गेल्या अडीच वर्षांपासून कृषी अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या 1060 जागा रिक्त

औरंगाबाद3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मंत्रीस्तरावर ठोस निर्णय होत नसल्याने मराठवाडा कृषी विभागात जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, कृषी उपसंचालक, जिल्हा कृषी विकास अधिकारी यासह विविध प्रवर्गातील १०६० जागा रिक्त आहेत. किमान तीन मदत योजना कागदावरच रेंगाळत आहेत. उपलब्ध अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कामांचा अतिरिक्त भार पडत असल्याने तेही हैराण झाले आहेत.

औरंगाबाद, जालना व बीड जिल्ह्यातील सर्वाधिक ८४८ पदे रिक्त आहेत. प्रथम, द्वितीय श्रेणीच्या १३५, तृतीय श्रेणीच्या ४७६ आणि चतुर्थ श्रेणीच्या २३७ जागा रिकाम्या आहेत. लातूर विभागातील पाच जिल्ह्यांत २१२ जागा भरलेल्या नाहीत. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, महाविकास आघाडी सरकारच्या काळात कोरोनामुळे भरती प्रस्ताव लांबणीवर पडला. त्यात काँग्रेस-राष्ट्रवादीशी ताळमेळ नसल्याचीही भर पडल्याने राजकीय पाठपुरावा झाला नाही.

मराठवाड्यात औरंगाबाद व लातूर असे दोन कृषी विभाग असून आठ जिल्ह्यांचा समावेश होतो. ४८ लाख ५७ हजार १५२.२४ हेक्टरपैकी ४७ लाख ९८ हजार ८८८.६७ म्हणजे ९८ टक्के क्षेत्रावर खरीप पेरणी पूर्ण झाली आहे. पण हवामान बदलामुळे कीड व रोगांचा प्रादुर्भाव वाढलेला आहे. मात्र, अधिकारी ते कर्मचाऱ्यांचीच एक हजारांवर पदे रिक्त शेतीच्या बांधावर जाऊन मार्गदर्शन, नैसर्गिक आपत्तीची माहिती अगोदर पोहोचवणे, पीक पद्धतीत बदलाबाबत योग्य मार्गदर्शन होत नाही. परिणामी शेवटी उत्पादन कमी व खर्च जास्त अन् शेतीचे गणित तोट्यात जाते.

बातम्या आणखी आहेत...