आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहरात २१ वर्षांनंतर सिंधी समाजाचा वधूू-वर मेळावा झाला. यात ७० मुली आणि १८० मुले असे २५० उमेदवार मेळाव्यात सहभागी झाले होते. व्यापारी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या समाजात सीए आणि इंजिनिअर तरुणांचे प्रमाण लक्षणीय वाढले आहे. उच्चशिक्षित तरुणींची संख्या अधिक आहे. सिंधी समाजात हुंडा घेतला जात नाही या वैशिष्ट्यावर आयोजकांचा विशेष भर होता. सिंधी कॉलनीतील कंवर कुटिया मैदानावरील सभागृहात अखंड सिंधी सेवा फाउंडेशन, सिंधी पंचायत आणि उबडो सिंधी पंचायतीच्या वतीने हे आयोजन करण्यात आले होते.
अखंड सिंधी सेवा फाऊंडेशनचे अध्यक्ष हरीश तलरेजा म्हणाले, आतापर्यंत विविध ठिकाणी १३ वधू-वर मेळावे झाले. यामध्ये ७५० जणांचे विवाह जुळले. मी स्वत: २७ जणांचे कन्यादान केले. मुलींनी आपल्याच समाजात लग्न करावे.
थॅलेसेमिया चाचणी करूनच विवाह करा वैद्यकीयदृष्ट्या आपण प्रगत झालो आहोत. त्यामुळे नव्या बदलांचा स्वीकार करा. थॅलेसिमिया चाचणी केली तर पुढच्या समस्या आपण टाळू शकतो. त्यामुळे प्रत्येक जोडप्याने ही चाचणी केली पाहीजे, असा सल्ला किशनचंद तनवाणी यांनी दिला.
आमचा समाज हुंडा घेत नाही आमच्या समाजात मुलगा-मुलगी समान मानतात. त्यामुळे हुंडा घेण्याची पद्धतच आमच्यात नाही. उलट विवाहाचा खर्चही मुलाकडील मंडळी ७५ टक्के करतात. - अजय तलरेजा, आयोजक
महिनाभरापासून सुरू नोंदणी सिंधी समाजाची ७०० कुटुंबे आहेत. २००० मध्ये पहिल्यांदा मेळावा घेतला होता तेव्हा ४०० उमेदवारांची नोंदणी होती. आता २५० झाली. कारण आता अनेक वधू-वर सूूचक केंद्रे आहेत. विविध शहरांत मेळावे होत राहतात. - राजू तनवाणी, आयोजक
समाज बदलतो आहे आमच्या समाजातील मुली उच्चशिक्षित आहेत. मुलगा व्यवसाय करणारा असला तरीही शिकलेला असावा अशी मुलींची अपेक्षा आहे. हा महत्त्वाचा बदल समाजात दिसतो. मुलांची मानसिकता समानतेची झाली आहे. - किशोर काल्डा, आयोजक
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.