आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मरण पत्करेन, पण गद्दारी करणार नाही:आमदार उदयसिंह राजपूत; शिवसेनेने मला विधानसभेवर पाठवले, विश्वास तोडणार नाही

औरंगाबाद3 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कन्नड-सोयगांव मतदारसंघातील जनतेने स्थानिक नेत्यांनी माझ्यावर प्रेम, विश्वास दाखवला, त्याला कदापी तडा जाऊ देणार नाही. एकवेळ मरण पत्करेन, पण शिवसेनेशी कधीही गद्दारी करणार नाही, अशा प्रांजळ भावना आमदार उदयसिंह राजपूत यांनी व्यक्त केल्या. सद्याच्या राजकीय आणि बंडखोरीच्या काळात त्यांचे वक्तव्य महत्वाचे मानले जात आहे.

राजपूत मुंबईहून औरंगाबादेत आले. त्यांचे चंद्रकांत खैरे नंदकुमार घोडेले यांनी त्यांचे स्वागत केले. त्यानंतर त्यांनी 'दिव्य मराठी'च्या प्रतिनिधीशी संवाद साधला.

शिवसेनेमुळे मी विधानसभेत

राजपूत म्हणाले, विधानसभा निवडणूक लढलो; पण नशिबाने नेहमीच मला हुलकावणी दिली. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरेंनी माझ्यावर विश्वास टाकत उमेदवारी दिली आणि मी निवडून आलो. शिवसेनेने मला विधानसभेत जाण्याची संधी दिली.

वर्षावर सहज मिळतो प्रवेश

वर्षावर जाण्यासाठी मला कधीही अडचणी आल्या नाहीत, मी किमान पंधरा वेळा वर्षावर गेलो आहे. प्रत्येक वेळी आम्हाला केवळ एका फोनवर मुख्यमंत्री भेटत होते; त्यामुळे ताटकळत ठेवण्याचा प्रश्नच नसल्याचे कन्नड चे आमदार उदयसिंह राजपूत यांनी सांगितले.

बडवे नाही थेट भेट

संजय शिरसाट यांनी ठाकरे याच्याबाबत पत्र लिहिले आहे. त्याबाबतच्या पत्राबाबत विचारले असता माझा असा अनुभव नसल्याचे त्यांनी सांगितले. मी मुंबईत गेलो आणि वर्षा वर जाण्यापूर्वी आम्हाला लगेच येण्याची वेळ कळवली जात होती. तर व्हाट्सउप देखील उत्तर दिले जात होते त्यामुळे मला कधीच अडचण आली नसल्याचा दावा राजपूत यांनी 'दिव्य मराठी'शी बोलताना केला आहे. तसेच मी कायम शिवसेनेसोबत राहणार असल्याचे त्यांनी सांगितले

यांनी केले स्वागत

शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, कन्नडचे शिवसेना आमदार उदयसिंग राजपूत यांचे संभाजीनगर विमानतळावर शिवसैनिकांनी जल्लोषात स्वागत केले. यावेळी मराठवाडा विभागीय सचिव ऍड. अशोक पटवर्धन, माजी महापौर नंदकुमार घोडेले, उपजिल्हाप्रमुख आनंद तांदूळवाडीकर , शहरप्रमुख विश्वनाथ स्वामी, उपशहर प्रमुख हिरालाल सलामपुरे, राजू खरे, माजी नगरसेवक वीरभद्र गादगे, देविदास रत्नपारखी, दिनेश तिवारी, लक्ष्मण गिऱ्हे आदींसह शिवसैनिक उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...