आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कॉलेज प्रवेश:सर तुमच कॉलेज सुरक्षित आहे ना? कॉरंटाईन सेंटर असल्याने महाविद्यालयांसमोर नवे आवाहन

औरंगाबादएका वर्षापूर्वीलेखक: विद्या गावंडे
  • कॉपी लिंक
  • प्रवेश नोंदणीपूर्वीच पालक- विद्यार्थी करतायेत विचारणा

दहावी-बारावीच्या निकालानंतर आता विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेस ऑनलाइन पद्धतीने सुरुवात झाली आहे. या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत तांत्रिक अडचणी येत असतांनाच आता महाविद्यालय प्रशासनासमोर नवे आवाहन निर्माण झाले आहे. कोरोना विषाणूमुळे अनेक जिल्हयांमध्ये शाळा-महाविद्यालय हे कॉरंटाइन सेंटर करण्यात आले होते. त्यामुळे प्रवेश नोंदणीपूर्वीच पालक विद्यार्थी हॉस्टेल सुविधेपेक्षाही आता सुरक्षितता आहे का अशी विचारणा करत असल्याचे खुद्द महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी सांगितले.

माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या दहावी- बारावी बोर्ड परीक्षेचा निकाल जुलै महिन्यात जाहिर करण्यात आला. यंदा देशभरात कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहता शाळा-महाविद्यालयांना मार्च महिन्यातच सुट्या देण्यात आल्या होत्या. तर दहावीचा भूगाले विषयाचा पेपर बाकी असतांना तो रद्द करत सरासरी गुण देण्याचा निर्णय झाला. कोरोनामुळे सुरक्षितात लक्षात घेता फिजिकल आणि सोशल डिस्टन्स पाळा, मास्क वापरा, सॅनिटायझरचा उपयोग करा, गर्दीत जावू नका असे नियम करण्यात आले. मात्र वाढती रुग्ण संख्या पाहता शाळा-महाविद्यालयांच्या इमारती, हॉस्टेल्स हे कॉरंटाइन सेंटर म्हणून देण्यात यावेत असा निर्णय घेण्यात आला. सध्या अनेक शाळा महाविद्यालय हे कॉरंटाइन सेंटर आहेत. शिक्षण संस्था सुरु होण्यापूर्वी संपूर्ण इमारतींचे निर्जंतूकीकरण केल्या शिवाय वर्ग भरवण्यात येवू नये अशा सूचना देण्यात आल्या आहेत. सूचना दिल्या असल्या तरी आता प्रत्यक्ष प्रवेश प्रक्रियेस सुरुवात झाली आहे. ऑनलाइन प्रवेश असले तरी ग्रामीण भागातून शहरात शिक्षणासाठी येणारा विद्यार्थी वर्ग मोठा आहे. त्यामुळे प्रवेश घेतांनाच सुविधा आणि विद्यार्थी सुरक्षेेला पालक प्राधान्य देतात. अकरावी प्रवेश प्रक्रियेत सध्या हाच प्रत्येय शिक्षण संस्थांना येत आहे. प्रवेश नोंदणीच्या वेळीच दूरध्वनीद्वारे तुमचे कॉलेज कॉरंटाइन सेंटर होते का मग आता कुणी तथे नाही ना सुरक्षितता आहे का अशी विचारणा केली जात असल्याचे देवगिरी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. आर.बी. गरुड यांनी सांगितले. तर कोरोनाबद्दल असलेले समज-गैरसमज पाहता शाळा-महाविद्यालये कधी सुरु होतील माहिती नाहीत. परंतु ग्रामीण भागात प्रवेश घेणाऱ्यांची संख्या वाढण्याची शक्यता असल्याचे प्राध्यापकांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...