आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

औरंगाबाद:बहीण-भावाचा गळा चिरून निर्घृण खून, एमआयटी चाैकात कोरोनाच्या थैमानात क्रौर्याची परिसीमा

औरंगाबाद9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आई-वडील सायंकाळी परतल्यावर घटना उघडकीस

शहरातील बीड बायपासवरील एमआयटी चौक परिसरात राहणाऱ्या बहीण-भावाची मंगळवारी गळा चिरून निर्घृण हत्या करण्यात आली. जालना जिल्ह्यातील आपल्या शेतातून आई-वडील सायंकाळी घरी आल्यावर ही घटना उघडकीस आली. याप्रकरणी सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

किरण लालचंद खंदाडे (१८, रा. अल्पाइन हॉस्पिटलजवळ) व तिचा भाऊ सौरभ लालचंद खंदाडे (१६) अशी हत्या झालेल्या बहीण-भावांची नावे आहेत. किरण ही पुण्यातील मॉडर्न कॉलेजमध्ये उच्च शिक्षण घेत होती, तर सौरभ हा पोदार इंटरनॅशनल स्कूलमध्ये दहावीत शिकत होता.

मंगळवारी खंदाडे दांपत्य मोठ्या मुलीला सोबत घेऊन नेहमीप्रमाणे शेतात गेले. संध्याकाळी ८ वाजता घरी परतले, तेव्हा त्यांना घरामध्ये रक्ताच्या थारोळ्यात किरण आणि सौरभ आढळले. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच सातारा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या ठिकाणी चोरीदेखील झाल्याचा संशय आहे.

आई-वडिलांचे शेतीसाठी अप-डाऊन

किरण आणि सौरभचे आई-वडील जालना जिल्ह्यातील पाचनवडगाव येथे शेती करतात. शेतीसाठी ते औरंगाबाद शहरातून अप-डाऊन देखील करतात. बीड बायपास भागात अल्पाइन हॉस्पिटल परिसरात दोन मजली पाच खोल्यांचा बंगला भाड्याने घेऊन खंदाडे कुटुंब राहते.

आरोपी आेळखीचे असल्याचाही संशय

खंदाडे यांच्या घराचे लाकडी व लोखंडी दोन्ही दरवाजे उघडेच होते. तसेच त्यांच्या घरात टेबलवर चहाचे चार कपही पोलिसांना दिसून आले. याचाच अर्थ कोणीतरी आेळखीच्या दोन व्यक्ती घरात आल्या असाव्यात. यातून बहीण-भावाचा घात झाला असल्याचा पाेलिसांना संशय आहे.

बातम्या आणखी आहेत...