आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजकीय:बहीण पंकजांनी अजून भावाला दु:ख सांगितलेले नाही : महादेव जानकर

औरंगाबाद4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘पंकजा मुंडे माझ्या बहीण आहेत. त्यांनी अजून भावाला दु:ख सांगितलेले नाही. ते सांगितल्यानंतर पंकजांवर अन्याय झाला की नाही ते ठरवता येईल,’ असे राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते व माजी मंत्री महादेव जानकर यांनी साेमवारी पत्रकारांना सांगितले. ‘ओबीसी समाजाने ‘डिमांडर’ नव्हे तर आता ‘कमांडर’ व्हावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

या वेळी पक्षाचे महासचिव बाळासाहेब दोडतोले, प्रवक्ते भास्कर टेकाळे, अशोक लांडे, सुरेश कटारे, शहराध्यक्ष रशीद खान, शीतल कांबळे, दिलीप रिठे, किशोर माळी यांची उपस्थिती होती. जानकर म्हणाले, ओबीसी आरक्षणाबाबत केंद्र व राज्य सरकारविराेधात माेठी नाराजी आहे. ओबीसीची जनगणना व्हावी अशी आमची भूमिका आहे. ओबीसींची जनगणना नाही झाली तर भाजपसोबत राहायचे की नाही याचा विचार करावा लागेल. या मागणीसाठी केंद्राविराेधात आंदाेलन करू. लोकसेवा आयोगात इतर समाजाचे सदस्य नियुक्त करण्यात यावे. केवळ एकाच समाजाचे लोक नकोत, असेही ते म्हणाले. पंकजा यांच्याविषयीच्या प्रश्नावर जानकर म्हणाले, ‘पंकजा यांना सल्ला देण्याइतका मी मोठा झालेलाे नाही.’

मनपाच्या सर्व जागा स्वबळावर
औरंगाबाद मनपा निवडणुकीत सर्व जागा रासप स्वबळावर लढणार आहे. ५६ वाॅर्डांत उमेदवार निवड चाचणी अंतिम टप्प्यात आहे. खराब रस्ते, पाण्याची समस्या, शहराचे बकालपण आम्ही लोकांसमोर मांडणार आहोत. तसेच कोकणातून पाणी आणून मराठवाड्याला वाॅटरग्रीडद्वारे देण्याची मागणीही आम्ही केली असल्याचे जानकर म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...