आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हिंगोली:जिल्हयात घरफोडी करणाऱ्या सहा जणांना अटक, 10.81 लाखांचा ऐवज जप्त, हिंगोली, नांदेड जिल्ह्यातील घरफोडी उघड होणार

हिंगोली6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • हिंगोली जिल्ह्यात मागील काही दिवसांत घरफोडीच्या घटना घडल्या आहेत.

हिंगोली जिल्हा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नांदेड येथून घरफोडी करणाऱ्या सहा अट्टल गुन्हेगारांना अटक केली असून त्यांच्याकडून १०.८१ लाख रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. त्यांच्याकडून हिंगोली व नांदेड जिल्ह्यातील घरफोड्या उघडकीस येणार असून त्यादृष्टीने तपास सुरु असल्याची माहिती पोलिस अधिक्षक राकेश कलासागर यांनी शुक्रवारी ता. २३ पत्रकार परिषदेत दिली आहे.

येथील पोलिस अधिक्षक कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत पोलिस अधिक्षक कलासागर यांच्यासह अप्पर पोलिस अधिक्षक यशवंत काळे, गुन्हे शाखेचे निरीक्षक जगदीश भंडारवार उपस्थित होते.

हिंगोली जिल्ह्यात मागील काही दिवसांत घरफोडीच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे या गुन्हयांची उकल करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचेे निरीक्षक जगदीश भंडारवार, उपनिरीक्षक शिवसांब घेवारे, किशोर पोटे, जमादार बालाजी बोके, विलास सोनवणे, संभाजी लकुळे, विठ्ठल कोळेकर, किशोर कातकडे, ज्ञानेश्‍वर सावळे, विट्ठळ काळे, जयप्रकाश झाडे यांचे पथक स्थापन केले होते.

या पथकाने मागील आठ दिवसांपासून घरफोडीतील गुन्हेगारांचा शोध सुरु केला होता. यामध्ये काही जण नांदेड येथे असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांच्या पथकाने नांदेड येथील रेल्वे उड्डाणपुलाखाली असलेल्या पालावर छापा टाकला. यामध्ये अनिल महादेव भोसले, राजू मल्लप्पा भोसले, शंकर उर्फ टिल्या परसराम भोसले यांच्यासह ॲटो चालक गोंविंद विठ्ठल सुर्यंवंशी, संंतोष शंकरराव पुणकेवार, राहूल तुकाराम खानजोडे (रा. नांदेड) यांना अटक केली आहे.

पोलिसांनी त्यांची अधिक चौकशी केली असता त्यांनी हिंगोली जिल्ह्यातील वसमत, तोंडापूर, वरुडतांडा, किन्होळा, खांडेगाव, टाकळगाव व वसमत येथील शास्त्री नगरातील घरफोडी केल्याची कबुली दिली आहे. पोलिसांनी त्याच्याकडून सोन्या चांदीचे दागिने, मोबाईल असा १०.८१ लाखाचा ऐवज जप्त केल्याचे पोलिस अधिक्षक कलासागर यांनी सांगितले. त्यांच्याकडून हिंगोली व नांदेड जिल्हयातील अनेक घरफोड्या उघडकीस येण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे.

बातम्या आणखी आहेत...