आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हवामान बदल:उन्हाळा सहा महिने, हिवाळा दोन महिने; वाढत्या हरित गृह वायू उत्सर्जनाचा परिणाम

औरंगाबाद / अजय कुलकर्णीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • ऋतुचक्र बदलाचा शेती, प्राणिसृष्टीवर मोठा परिणाम

उन्हाळा सहा महिन्यांचा, हिवाळा दोन महिन्यांचा तर पावसाळा चार महिन्यांचा असे ऋतुचक्र होण्याची शक्यता आहे. या शतकाअखेर हंगामांचे स्वरूप असे राहण्याची शक्यता जिओफिजिकल रिसर्च लेटर या जर्नलमध्ये प्रकाशित एका संशोधनात व्यक्त करण्यात आली आहे. जगभर मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या हरित वायूच्या उत्सर्जनामुळे ऋतुचक्रात हे बदल होत आहेत. उन्हाळा ७८ दिवसांवरून ९५ दिवस असा वाढला आहे तर हिवाळा ७६ दिवसांवरून ७३ दिवसांवर आल्याचे निष्कर्ष या संशोधनात आहेत.

संशोधनानुसार, हरित गृह वायू उत्सर्जनामुळे उत्तर गोलार्धातील भूमध्य प्रदेश व तिबेटच्या पठार परिसरात ऋतुचक्रातील हे बदल ठळक जाणवत आहेत. हिमालयात १५०० ते ३६०० मीटर उंचीवर आढळणाऱ्या ऱ्होडोडेंड्रॉन या सदाहरित वृक्षाला साधारणत: मार्च-एप्रिलमध्ये फुलोरा येतो. मात्र यंदा जानेवारीतच ही झाडे फुलोऱ्यात आली. हे उन्हाळा लवकर दाखल झाल्याचे लक्षण आहे. या फुलोऱ्यासाठी सरासरी १५ ते २० अंश सेल्सियस तापमान आवश्यक असते. हिंदीत बुरांस या नावाने ओळखले जाणारे हे झाड उत्तराखंडचा राज्य वृक्ष, नेपाळचा राष्ट्रीय वृक्ष तर जम्मू-काश्मीर व हिमाचलचे राज्य फूल आहे. १९५२ ते २०११ या काळातील निरीक्षणांनुसार हिवाळ्याचे दिवस ७६ वरून ७३ पर्यंत घटले आहेत. उन्हाळा ७८ दिवसांवरून ९८ दिवसांपर्यंत लांबला आहे. वसंत ऋतू ११५ वरून १२४ दिवस तर शरद ऋतू ८२ वरून ८७ दिवसांवर आला. स्थलांतरित पक्ष्यांचे पॅटर्न बदलले असून वनस्पतीचे लवकर फुलोऱ्यात येणे, लवकर फळधारणा होणे यामुळे अन्नासाठी त्यावर अवलंबून प्राणी हे समीकरण जुळेनासे झाल्याने पर्यावरणातील अन्नसाखळीच धोक्यात आल्याचा निष्कर्ष संशोधनात आहे.

ऋतुचक्र बदलाचा शेती, प्राणिसृष्टीवर मोठा परिणाम
भारतीय शेती आणि प्राणिसृष्टीवर या ऋतुचक्र बदलाचा मोठा परिणाम जाणवत आहे. अरुणाचल प्रदेशात गेल्या पाच-सहा वर्षांपासून आंब्याला लवकर फळधारणा होत आहे. महाराष्ट्रातही असाच अनुभव येत आहे. ऋतुचक्रातील या बदलामुळे शेतीचा हंगाम, प्रक्रिया तसेच वनस्पती व प्राण्याच्या वर्तनावर परिणाम होत आहे. उष्णतेच्या लाटांचे जास्त प्रमाणात येणे, सरासरीहून जास्त वादळे येणे व वणवे लागण्याचे प्रमाण वाढणे असे प्रकार जास्त दिसतील, असे संशोधनात म्हटले आहे.

बातम्या आणखी आहेत...