आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
मध्य प्रदेशातील सारंगपूर येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५२ वर साेमवारी सकाळी ६ वाजता झालेल्या भीषण अपघातात वडोदवाडी (ता. फुलंब्री, जि. आैरंगाबाद) आश्रमाचे महंत सोमेश्वरगिरी महाराज, अनंतगिरी महाराजांसह इंदूरमधील एकाच कुटुंबातील चार जण जागीच ठार झाले.
वडोदवाडीच्या श्री पूर्णेश्वर महादेव सेवाश्रमाचे महंत सोमेश्वरगिरी महाराज (४५) व अनंतगिरी महाराज (३३) हे आपल्या शिष्यांसह इनाेव्हा कारने (एमएच २० बीवाय २७२७) २१ जून राेजी रात्री १० वाजता आैरंगाबादहून लखनऊ येथील ठाकूरगंजमधील कल्याणगिरी आश्रमात जाण्यासाठी निघाले हाेते. साेबत २ सहकारी व लहान मुलगा हाेता. इंदूरच्या भगीरथपुरा येथील यादव कुटुंब वॅगन आर कारने गुनाहून इंदूरकडे जात होते. सकाळी ६ वाजेच्या सुमारास महामार्गावर भरधाव दाेन्ही कारची समाेरासमाेर धडक झाली. यात साेमेश्वरगिरी महाराज, महंत अनंतगिरी महाराजांसह शैलेश यादव (४०), त्यांच्या आई सिया दुलारी यादव (६०), मुलगा मोहित यादव (१४) हे जागीच ठार झाले, तर शैलेश यांचे वडील अमरसिंह यादव (६५) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. इनाेव्हा कारचा चालक सार्थक प्रकाश वाघ (२२), अभिषेक कमल (१९) आणि कैलाश (१४, सर्व रा. वडाेदबाजार) यांना गंभीर अवस्थेत सारंगपूरच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.