आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

अपघात:चारठाण्याजवळ दोन दुचाकींच्या भीषण अपघातात सहाजण गंभीर जखमी

परभणी25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

चारठाणा येथून दोन कि.मी.अंतरावर असलेल्या जिंतुर - जालना रस्त्त्यावरील सिंगटाळा पाटीवर स्कुटी व मोटारसायकलच्या अपघातात सहा जण जखमी झाले आहे. चार जणांची प्रकृती गंभीर बनल्याने त्यांना परभणी येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आहे. सोमवारी (दि.31) दुपारी एकच्या सुमारास हा अपघात घडला.

विना क्रंमाकाच्या स्कुटीवर तिघेजण जिंतूर येथून वाघी ( धानोरा ) या गावाकडे जात होते. तर होंडा कंपनीच्या (एम.ए.४८ झेड.३६९४) या क्रमांकाच्या मोटारसायकलवर जिंतुर तालुक्यातील कोठा येथील तिघे जिंतुरकडे जात होते. दरम्यान सिंगटाळा पाटीवर दोन दुचाकीची समोरासमोर धडक होऊन त्य‍ात अनिल शिंदे (वय २०), राजु निकाळजे (वय ३५), उत्तम वाघ (वय ५२, सर्व रा.कोठा ता.जिंतुर) मल्हारी वाघ (वय ५५),सुशीलाबाई पवार (वय ३५), रामदास पवार (वय १२ रा.धानोरा ता.जिंतुर) असे एकुण सहा जण सदर अपघातात गंभीर जखमी झाले आहेत.दरम्यान जखमीना ग्रामस्थ व पोलीसांनी उपचारासाठी तात्काळ परिवहन मंडळाच्या बसमधुन जिंतुर येथील ग्रामीण रुग्णालयात हलविले. परंतु यातील चार जणांची प्रकृती गंभीर बनल्याने त्यांना पुढील उपचारासाठी परभणी येथे हलविण्यात आले आहे.घटनास्थळी सहाय्यक पोलीस निरिक्षक बळवंत जमादार,.शेख याकुब,डि.डी.बुकरे व होमगार्ड कोकाटे यांनी तात्काळ भेट देऊन जखमींना रुग्णालयात हलविले व अपघातग्रस्त वाहाने बाजुला करुन जिंतुर - जालना रस्त्यावरील वाहतुक सुरळीत केली.

खड्डे चुकविताना झाला अपघात

जिंतूर - चारठाणा दरम्यान सदरील मुख्य रस्त्यावर सर्वत्र खड्डेच खड्डे झाल्याने सदर रस्त्यावर अपघाताचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. सदर अपघात देखील त्याच कारणामुळे झाल्याचे समजते. एकंदरीत सदर रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी अनेक दिवसापासून खडी व इतर साहित्य रस्त्यावर येऊन पडले आहे. परंतु अर्धे खड्डे काही दिवसापुर्वी बुजविण्यात आले तर बाकीचे खड्डे तसेच आहेत.