आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उद्योगांसाठी महाराष्ट्रात पोषक वातावरण:गतिमान प्रशासनासह कुशल मनुष्यबळ, सुविधांत अग्रेसर तरी भ्रष्टाचार अन् भागीदार निवडीचे अडथळे

महेश जोशी | औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • ईज ऑफ डुइंग बिझनेसमध्ये अन्य राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राची आघाडी
  • ‘आत्मनिर्भर भारत’मुळे परदेशी गुंतवणूकदार कंपन्यांना वाटते मोठी संधी

राज्यात येऊ घातलेल्या उद्योगांच्या स्थलांतरामुळे शिंदे-फडणवीस सरकार टीकेचे धनी ठरत असले तरी युनायटेड किंगडममधील (ब्रिटन) गुंतवणूकदारांच्या दृष्टीने महाराष्ट्र उद्योगांसाठी पहिल्या पसंतीचे राज्य आहे. येथील पायाभूत सुविधा, कुशल मनुष्यबळ, वेगाने परवानग्या व पोषक धाेरणे, तसेच ईज ऑफ डुइंग बिझनेसच्या निकषांतही त्यांना महाराष्ट्र सर्वोत्तम वाटतो. भारत व यूकेमध्ये औद्योगिक विकासासाठी “दि यूके इंडिया बिझनेस काैन्सिल’ ही संघटना कार्य करते. संघटनेच्या वतीने ८ वर्षांपासून “डुइंग बिझनेस इन इंडिया-द यूके पर्स्पेक्टिव्ह’ हे सर्वेक्षण केले जाते. यंंदाच्या सर्वेक्षणासाठी युकेच्या भारतात असलेल्या सर्व प्रमुख क्षेत्रांतील ६०० पैकी १११ उद्योगांची मते जाणून घेण्यात आली. यात २५० ते १००० मनुष्यबळ आहे. या सर्वांनी गुंतवणुकीसाठी महाराष्ट्राला पसंती दिली आहे.

ईज ऑफ डुइंग बिझनेस
"ईज ऑफ डुइंग बिझनेस'च्या 12 निकषांवर यूकेच्या उद्योजकांनी दिले ५ पैकी गुण
टेलिकम्युनिकेशन 3.77
कुशल मनुष्यबळ 3.42
सप्लाय चेन 3.14
पायाभूत सुविधा 2.97
क्रेडिट अँड फायनान्स 2.96
डेटा प्रोटेक्शन 2.8
कर प्रणाली 2.8
उद्योगांसाठी कायदे 2.8
कामगार कायदे 2.7
इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी 2.64
पर्यावरणीय नियमावली 2.4
प्रशासकीय प्रक्रिया 2.3

महाराष्ट्राचा डंका : १२ निकषांत पास
ईज ऑफ डुइंग बिझनेसच्या १२ निकषांत देशातील २८ राज्ये व ८ केंद्रशासित प्रदेशांमध्ये महाराष्ट्राचा देशात पहिला क्रमांक आला आहे. यूकेच्या उद्योजकांना महाराष्ट्रात नवीन व्यवसाय सुरू करण्यास व विस्तारासाठी पोषक वातावरण वाटते. या निकषांसोबतच चांगल्या शैक्षणिक संस्था, रुग्णालये, करमणुकीची साधनेही उद्योगांना महत्त्वाची वाटतात.

या निकषांवर राज्यांना ५ पैकी गुण असे
महाराष्ट्र 3.33
गुजरात 3.27
चंदीगड 3.26
हरियाणा 3.25
हिमाचल 3.22

आंध्र प्र. 3.21 उत्तर प्र. 3.19 तामिळनाडू 3.12 उत्तराखंड 3.11 पुद्दुचेरी 3.06 तेलंगण 3.05 गोवा 3.04 मध्य प्र. 3.00

आत्मनिर्भरतेची संधी व आव्हानेही : परदेशी गंुतवणुकीला दुय्यम स्थान दिले जाईल अशी भावना
67% इंग्लंडच्या उद्योजकांना सरकारने सुरू केलेल्या ‘आत्मनिर्भर भारत’ मोहिमेमुळे भारतात गुंतवणुकीला संधी असल्याचे वाटते. यातून व्यापाराच्या संधी वाढतील, असे त्यांचे मत आहे.
33% उद्योजकांना या मोहिमेमुळे भारत परदेशी गुंतवणुकीला दुय्यम किंवा पर्यायी स्थान देईल व स्वावलंबी झाल्याने परकीय गुंतवणुकीवर परिणाम होईल असे वाटते.

ही आहेत भारताची बलस्थाने
मोठी बाजारपेठ, ग्राहकांकडून सेवा वा वस्तूंची मागणी, तज्ज्ञ व कुशल मनुष्यबळ, उद्योगाभिमुख धोरणे, पायाभूत सुविधा, डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर, बँकांकडून कर्जपुरवठा, जागेची उपलब्धता.

या आहेत काही अडचणी
किचकट कायदे, भागीदाराची निवड, महागाई, यंत्रणेतील भ्रष्टाचार, जीएसटी, आयात शुल्क, आयात-निर्यात नियमावली, राजकारण, भूसंपादन, परदेशी गंुतवणुकीला मर्यादा.

उद्योगांना या आहेत अपेक्षा
प्रशासकीय बाबींचा वेळ घटावा, जीएसटीची क्लिष्टता कमी व्हावी, एक खिडकी योजना गतिमान व्हावी, केंद्र व राज्यांच्या नियमांमध्ये समन्वय, कामगार व जमिनीसंदर्भात कायदे सोपे व्हावेत.

भारत, महाराष्ट्राला पसंती
^भारताने ईज ऑफ डुइंग बिझनेसमध्ये मोठी भरारी घेतली आहे. ई-गव्हर्नन्स, निर्णयांत पारदर्शकता व प्रॉडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह यांसारख्या योजनांमुळे भारत गुंतवणुकीसाठी यूकेच्या ६१% उद्योजकांना योग्य ठिकाण वाटत आहे. त्यात महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे.'
- केलॅन फिनेगॅन, पॉलिसी अँड अ‍ॅडव्होकसी मॅनेजर, यूके इंडिया काैन्सिल.

बातम्या आणखी आहेत...