आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आढावा:विधिमंडळ अधिवेशनामुळे स्मार्ट सिटी कमिटीची बैठक झाली रद्द ; सात महिन्यांनंतर होणार होती बैठक

औरंगाबाद4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्मार्ट सिटीची सात महिन्यांनी होणारी बोर्ड कमिटीची बैठक पुन्हा एकदा रद्द झाली आहे. ऊर्जा, उद्योग, कामगार विभागाच्या प्रधान सचिव विनीता सिंघल यांची महिनाभरापूर्वी स्मार्ट सिटीच्या मेंटॉरपदी नियुक्ती करण्यात आली. त्यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी (१५ डिसेंबर) पहिलीच बैठक होणार होती. मात्र, हिवाळी अधिवेशनाच्या तयारीसाठी ही बैठक रद्द केल्याचे सांगण्यात आले.

गेल्या जूनमध्ये तत्कालीन मेंटॉर बलदेवसिंग यांनी बैठक घेतली होती. त्यानंतर बैठकच झाली नाही. त्यामुळे प्रशासकीय पातळीवर घेण्यात येणारे अनेक निर्णय प्रलंबित आहेत. गुरुवारच्या बैठकीत निर्णय होतील, अशी अपेक्षा होती. मात्र, ही बैठक रद्द झाल्यामुळे आता हे विषय पुन्हा एकदा लांबणीवर पडणार आहेत.

या मुद्द्यांवर चर्चा अपेक्षित स्मार्ट सिटीकडून होणारी एक हजार कोटींची संपूर्ण कामे आता सुरू झाली आहेत. या बैठकीत सफारी पार्कचा आढावा हा महत्त्वाचा विषय होता. स्मार्ट सिटीच्या ३०० कोटींतून शहरातील १०८ रस्त्यांचे काम हाती घेण्यात आले होते. निधीअभावी यातील २२ रस्तेच पहिल्या टप्प्यात घेण्यात आले.त्यावर चर्चा अपेक्षित होती. याशिवाय स्मार्ट सिटी बससाठी ठेवलेली २०० कोटींची एफडी तोडण्यावरही चर्चा होणार होती.

बातम्या आणखी आहेत...