आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभावसिंगपुरा-पडेगाव रोडवर महापालिकेने पाच वर्षांपूर्वी कचरा डेपो तयार केला. तेव्हा लोकांनी प्रचंड विरोध केला. तेव्हा या कचऱ्यावर प्रक्रिया होईल, त्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावली जाईल, असे आश्वासन देण्यात आले. प्रत्यक्षात तेथे कचरा पेटवला जात आहे. त्यामुळे डेपोलगतच्या ग्लोरिया सिटी वसाहतीमध्ये राहणाऱ्या एक हजार कुटुंबांच्या नाकातोंडात दररोज धुराचे लोट जात आहेत. तर जुन्या साठलेल्या कचऱ्यातून तयार होणाऱ्या मिथेन वायूमुळे कचरा पेटतो. कुणीही आग लावत नाही. शास्त्रोक्त विल्हेवाटीसाठी निविदा काढण्यात आल्याचे घनकचरा व्यवस्थापन विभागप्रमुख सोमनाथ जाधव यांनी सांगितले.
भावसिंगपुऱ्यापासून पडेगावकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर २०१२ मध्ये ग्लोरिया सिटी उभारण्यात आली. तब्बल १९२ फ्लॅट, रो-हाऊस असलेल्या या वसाहतीत सुमारे १००० कुटुंबे वास्तव्यास आहेत. त्यांच्या वसाहतींपासून डेपो फक्त १२० मीटर अंतरावर आहे. येथील रहिवाशांनी सांगितले की, गेल्या महिनाभरापासून कचऱ्याला आग लावली जात आहे.
त्यामुळे प्रचंड दुर्गंधी सुटत आहे. बालाजी निखाते म्हणाले की, माझी ३ आणि ९ वर्षांची मुले धुरामुळे आजारी पडली. प्रमिता दास म्हणाल्या की, या त्रासामुळे लोक घर सोडण्याच्या मन:स्थितीत आहेत. रामराव दाभाडे, शीला बरडे, सुनील जाधव यांनी वारंवार आग कशी लागते, असा संशय व्यक्त केला.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.