आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मिरवणूक काढली:‘ज्ञानेश’च्या स्नेहल, करिष्माला 100 टक्के गुण; रथातून मिरवणूक काढली

औरंगाबाद13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिडकोतील ज्ञानेश विद्या मंदिर शाळेतील दोन विद्यार्थिनींनी दहावी परीक्षेत १०० पैकी १०० गुण मिळवले. या गुणवंत विद्यार्थिनींची रथातून मिरवणूक काढून जल्लोष करण्यात आला.

ज्ञानेश विद्या मंदिर शाळेतील १७६ विद्यार्थी दहावी परीक्षेसाठी बसले होते. त्यापैकी १७२ विद्यार्थी ७५ टक्क्यांपेक्षा अधिक गुण घेऊन उत्तीर्ण झाले. स्नेहल सूर्यवंशी व करिष्मा राजभर या विद्यार्थिनींनी १०० पैकी १०० गुण मिळवले. चैतन्य वाघ या विद्यार्थ्यांने ९८ टक्के गुण घेतले. यानिमित्त संस्थेच्या वतीने स्नेहल व करिष्माची रथातून मिरवणूक काढण्यात आली. या वेळी संस्थेच्या सचिव मीनाक्षी विटोरे, उपाध्यक्ष पूजा पऱ्हे, अध्यक्ष शैलेंद्र विटोरे, संचालक रजनी परमेश्वर, मुख्याध्यापक रामनाथ पंडुरे, उपमुख्याध्यापिका संजीवनी आरदवाड यांच्यासह पालक व माजी विद्यार्थी उपस्थित होते.

दोघी गरीब कुटुंबातील

अतिशय गरीब कुटुंबातील स्नेहल सूर्यवंशीचे वडील सुतारकाम करतात. आई गृहिणी आहे. तर करिष्मा राजभरचे पालकही छोट्याशा कंपनीत कामगार म्हणून काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात. अशा प्रतिकूल परिस्थितीतही दाेघींनी मिळवलेले यश काैतुकास्पद आहे, असे शिक्षक म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...