आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चिमुकल्या विद्यार्थ्यांची कला सादर:अतुल्य भारत थीमवर रंगले ‘तेजस्विनी’चे स्नेहसंमेलन

औरंगाबाद8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

लाेकनृत्य, पाेवाडा, संगीत, विविध चित्रपटांच्या गाण्यांवरील नृत्यांसह ‘अतुल्य भारत’ थीमवर आधारित देशभक्तिपर गीतांवर चिमुकल्या विद्यार्थ्यांनी कला सादर करत स्नेहसंमेलन गाजवले. निमित्त हाेते, न्यू हनुमाननगर गारखेडा परिसरातील तेजस्विनी इंग्लिश स्कूलच्या स्नेहसंमेलनाचे. येथील संत एकनाथ रंगमंदिरात नुकतेच स्नेहसंमेलन पार पडले.संमेलनाच उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष डाॅ. भुजंगराव गाराेळे यांच्या उपस्थितीत नाशिक येथील उपजिल्हाधिकारी एकनाथ बंगाळे यांच्या हस्ते करण्यात अाले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बी. बी. नालमवार, सुलभा नालमवार, तर जीएसटी विभागाचे अधिकारी सुरेश जाधव, प्राचार्य अर्चना बंगाळे आदींची उपस्थिती हाेती.

बातम्या आणखी आहेत...