आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराऔरंगाबाद रुमालाने गळा आवळून अल्पवयीन मुलाचा खून केल्याप्रकरणाने आता नविन वळण घेतले आहे. त्या अल्पवयीन मुलाच्या मित्रांपैकी एक सय्यद आमेर ऊर्फ चिरा सय्यद सलीम याने मृत अल्पवयीन मुला बरोबर अनैसर्गिक कृत्य केले. मात्र हे कृत्य केल्यानंतर तो त्याच्या घरी आणि परिसरातील लोकांना सांगेल या भितीपोटी त्याच्याच रुमालाने त्याचा गळा आवळून खून केल्याची कबुली त्याने दिली. तसेच खून केल्यानंतर मृताच्या मोबाइलमधील सिम तेथेच काढून फेकले आणि मोबाइल त्याने स्वत: जवळ ठेवल्याचे देखील त्याने कबूल केले आहे.
दरम्यान आरोपी सय्यद आमेर ऊर्फ चिरा आणि फेरोज युनूस शेख या दोघांना आज न्यायालयात हजर करण्यात आले असता, त्यांच्या पोलिस कोठडीत 21 जूनपर्यंत वाढ करण्योच आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस.व्ही. चरडे यांनी रविवारी (१९ जून) दिले.
प्रकरणात 16 वर्षीय मृत मुलाच्या वडीलांनी फिर्याद दिली. त्यानूसार, 11 जून रोजी सकाळी मृताचे अपहरण झाल्याची तक्रार फिर्यादीने दिली होती. तपासादरम्यान मृत काही युवकांना सोबत गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीवरून 14 जून रोजी पोलिसांनी सय्यद आमेर आणि फिरोज या दोघांना ताब्यात घेतले. पोलिसांनी खाक्या दाखवताच त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. सय्यद आमेर याने सांगितले की, मृत व दोघे आरोपी जाधवमंडी येथील झाडीमध्ये दारु पीत बसले होते. त्यावेळी फेरोज आणि मृत यांच्यात कोणत्यातरी कारणावरुन वाद झाला. त्यानंतर युसुफने रुमालाने फेरोजचा गळा आवळून खून केल्याची सांगितले. प्रकरणात जिन्सी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिस कोठडी दरम्यान तपासात आरोपी सय्यद आमेर उर्फ चिरा याने वरील प्रमाणे गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी आरोपी आमेर ऊर्फ चिरा याच्या घरातून त्याने गुन्हा करतेवेळी वापरलेले कपडे आणि मृताचा मोबाइल हस्तगत केला. तसेच दोघा आरोपींसह मृताच्या मोबाइलचा सीडीआर मिळण्यासाठी देखील पत्र व्यवहार सुरु केल्याचे पोलिसांनी सांगितला आहे.
दोघा आरोपींच्या कोठडीची मुदत संपल्याने त्यांना आज न्यायालयात हजर करण्यता आले असता, सहायक सरकारी वकील निता किर्तीकर यांनी गुन्ह्यातील साक्षीदार निष्पन्न करुन तपास करायचा आहे. अनैसर्गिक कृत्याच्या अनुषंगाने आरोपी व मयताची वैद्यकिय तपासणी करुन त्याचे सीए तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे. आरोपी व मयताचे सीडीआर प्राप्त करायचे आहेत. तसेच आरोपींचे आणखी कोणी साथीदार होता काय याचा देखील तपास बाकी असल्याने आरोपींच्या कोठडीत वाढ करण्याची विनंती न्यायालयाकडे केली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.