आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पे अँड पार्कला संघटनेचा विरोध:जिल्ह्यातील व्यापाऱ्यांच्या मदतीसाठी महासंघाची सोशल सिक्युरिटी स्कीम

औरंगाबाद6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘व्यापारी महासंघ आपल्या दारी’ या उपक्रमाच्या माध्यमातून शहर व जिल्ह्यातील व्यापाऱ्यांच्या अडीअडचणी जाणून घेण्याचा उपक्रम महासंघाने राबवण्यास सुरुवात केली आहे. यात दर आठवड्याला वेगवेगळ्या भागात जाऊन व्यापाऱ्यांच्या भेटीगाठी घेतल्या जातील. तसेच संघटनेतील सदस्यांकडून ठरावीक रक्कम घेऊन त्याच्या व्याजातून गरजू व्यापाऱ्यांना मदत केली जाणार आहे.

व्यापारी महासंघाचा भेटीगाठीचा उपक्रम बुधवारी (२३ नोव्हेंबर) गजानन महाराज चौकात झाला. या वेळी महासंघाचे अध्यक्ष संजय कांकरिया, महासचिव शिवशंकर स्वामी, उपाध्यक्ष खर्डे अप्पा, कोषाध्यक्ष,जयंत देवळाणकर, गजानन महाराज चौक व्यापारी संघटनेचे अध्यक्ष डॉ. परदेशी, सचिव अनंत जयस्वाल, सदस्य चंदनसिंग काहिते आदींची उपस्थिती होती. या वेळी बैठकीत मनपाने व्यापाऱ्यांवर लादलेला आस्थापना कर, पे अँड पार्क या विषयावर चर्चा होऊन त्याला विरोध दर्शवण्यात आला.

व्यापाऱ्यांसाठी सोशल सेक्युरिटी स्कीम: डॉ. परदेशी यांनी सोशल सेक्युरिटी स्कीमची संकल्पना मांडली. महासंघाचा सदस्य असलेल्या व्यापाऱ्यांकडून एक ठरावीक अनामत रक्कम घेऊन तिची एफडी केली जाईल. यातून येणाऱ्या व्याजातून व्यापाऱ्यांच्या समस्या सोडवल्या जातील. तसेच एखाद्या व्यापाऱ्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबीयांना तत्काळ मदत पोहोचवली जाईल.’

बातम्या आणखी आहेत...