आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मारहाण:पत्नीवर अनैसर्गिक अत्याचार करणारा सॉफ्टवेअर इंजिनिअर पती कोठडीत

औरंगाबाद13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पत्नीवर अनैसर्गिक अत्याचार केल्याच्या तक्रारीवरून जवाहरनगर पोलिसांनी पतीला बेड्या ठोकल्या आहेत. विशेष म्हणजे पती-पत्नी हे दोघेही सॉफ्टवेअर इंजिनिअर आहेत. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. एल. रामटेके यांनी पतीची २० नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडीत रवानगी केली.

या प्रकरणात ३० वर्षीय पीडित पत्नीने फिर्याद दिली होती. या दोघांचे २७ नोव्हेंबर २०१५ रोजी लग्न झाले होते. पती मुंबईत नोकरीला होता, लग्नानंतर दोघेही मुंबईला राहण्यासाठी गेले. २०१६ मध्ये पतीने पुण्याला फ्लॅट घेण्यासाठी बायकोच्या आई-वडिलांकडून २५ लाख रुपये घेतले. दरम्यानच्या काळात पती अश्लील वेबसाइट पाहणे व बाहेर अश्लील कृत्ये करत असल्याचे पत्नीला समजले. तिने त्याला यापासून परावृत्त करण्यासाठी अनेकदा समजावून सांगितले, पण तो तिलाच मारहाण करायचा.

त्यामुळे दोघांमध्ये नेहमीच वाद व्हायचे. २०१७ मध्ये त्याने पत्नीला मारहाण केली, बदनामी करण्याची तसेच माहेरी पाठवण्याचीही धमकी दिली. २०१८ मध्ये आरोपीने कार घेण्यासाठी माहेरहून पैसे आण म्हणून बायकोकडे तगादा लावला. तेव्हाही तिच्या आई-वडिलांनी दोन लाख रुपये दिले. त्यानंतरही आरोपीचे वागणे बदलले नाही. घाणेरडे चाळे करण्यासाठी तो पत्नीवर दबाव टाकायचा, नकार दिला तर मारहाण करायचा. घर नावावर करण्यासाठी पैशाची मागणी केली. त्यामुळे पत्नीने पतीविरोधात तक्रार दिली. त्यावरून सातारा पोलिसांनी पतीला अटक केली. न्यायालयाने त्याची पोलिस कोठडीत रवानगी केली.

बातम्या आणखी आहेत...