आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माती संवर्धनाचा जागर:‘मातीच्या संरक्षणामुळे जीवन फुलांसारखे सुगंधित होईल’

औरंगाबाद21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

माणसाने आपले सौंदर्य जपले पाहिजे, त्यात कधीही कमीपणा येऊ देऊ नका, असे झाले तर तुम्ही प्रत्येक परिस्थितीत आनंदी व्हाल. या जीव सृष्टीला फुलांसारखे सुगंधित करायचे असेल, तर माती संवर्धनासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याची प्रतिज्ञा घ्यावी, असे विचार अध्यात्मिक गुरू, ईशा फाउंडेशनचे संस्थापक पद्मविभूषण सद्गुरू जग्गी वासुदेव यांनी केले.

२६ देशांचा दौरा करून आलेल्या सद्गुरूंनी माती संवर्धनाचा जागर करण्यासाठी राजबाग लोणी काळभोर येथे उभारण्यात आलेल्या जगातील सर्वात मोठ्या विश्वशांती घुमट म्हणजेच तत्वज्ञ संत श्री ज्ञानेश्वर-जगदगुरू तुकाराम महाराज विश्व शांती प्रार्थना सभागृह व ग्रंथालयाला भेट दिली. त्यानंतर विद्यार्थ्यांशी संवाद साधून पर्यावरण रक्षण व माती संवर्धनाचे आवाहन केले. येथे सर्वांनी माती संवर्धनाची शपथ घेतली. हा कार्यक्रम एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीने आयोजित केला होता. या वेळी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. कराड, एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कार्याध्यक्ष प्रा. डॉ. मंगेश कराड, एमआयटी डब्ल्यूपीयूचे कुलगुरू डॉ. आर.एम.चिटणीस आणि प्र-कुलगुरू डॉ. मिलिंद पांडे उपस्थित होते. तसेच येथे हजारो विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सद्गुरू जग्गी वासुदेव म्हणाले, जागतिक तापमानात होणारी वाढ लक्षात घेऊन पर्यावरण संरक्षण आवश्यक आहे. रासायनिक खतांच्या वापरामुळे जमिनीची पोत शक्ती हळूहळू कमी होत आहे. प्राणी आणि वनस्पतींचे संरक्षण करण्यासाठी व जमिनीची सुपिकता राखण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे. पृथ्वीवरील परिसंस्थेमध्ये जैवविविधता अत्यंत महत्वाची आहे. जमिनीची सुपिकता कमी झाल्यामुळे पृथ्वीवर अन्नाचे उत्पादन कमी होईल.

बातम्या आणखी आहेत...