आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामराठवाडा शिक्षक मतदारसंघ राष्ट्रवादीच्या ताब्यात आहे. विक्रम काळे व त्यांचे वडील वसंतराव काळे यांनी शिक्षक संघटनेचा विजय रोखला. या निवडणुकीतही विक्रम काळे यांचे तिकीट निश्चित झाले आहे. मात्र, वक्ता सेलचे प्रदेशाध्यक्ष तथा प्रसिद्ध व्याख्याते प्रदीप सोळुंके यांनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे उमेदवारीची मागणी केली आहे. त्यामुळे एनसीपीत ट्विस्ट निर्माण झाले असून, तिकीट कुणाला मिळते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सोळुंके म्हणाले, शिक्षकांच्या हितासाठी डॉ. पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक संघटनेचा प्रदेशाध्यक्ष म्हणून काम केले. त्यानंतर २००० मध्ये राष्ट्रवादी शिक्षक संघटनेची स्थापना केली व अध्यक्षही झालो. त्यावेळी निवडणूक लढवण्याचा विचार होता. पण, वसंतराव काळे यांनी निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यामुळे माघार घेतल्याचे ते म्हणाले.
राष्ट्रवादी पक्षाने तिकीट दिले नाही तर.... पक्ष तिकीट नाकारणार नाही असे वाटते. परंतु, तिकीट नाहीच मिळाले तर अपक्ष लढायचे का, याबाबत विचारले असता, चाचपणी करून योग्य निर्णय घेईल, असे त्यांनी सांगितले. आमदारकी न मिळाल्याने त्यांनी दोन महिन्यांपूर्वी राजीनामा पाठवला होता, तो पक्षाने स्वीकारला नाही. आता तिकीट नाही मिळाले तर पक्षातून बाहेर पडण्यासाठी कारण मिळेल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.