आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवेदन:घाटी रुग्णालयातील 14 समस्यांवर तोडगा काढा; रिपाइं (ए) चे अधिष्ठाता रोटे यांना निवेदन

औरंगाबाद9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शासकीय वैद्यकीय रुग्णालय घाटीमध्ये ११ जिल्ह्यांतून रुग्ण येतात. त्यांना विविध समस्यांना सामोरे जावे लागते. या समस्या सोडवण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(ए)च्या वतीने १४ मागण्यांचे निवेदन नागराज गायकवाड यांनी अधिष्ठाता डॉ. वर्षा रोटे यांना शुक्रवारी दिले. यावेळी उपअधिष्ठाता डॉ. श्रीनिवास गडप्पा, डॉ. सय्यद बेग, रुग्णालय अधीक्षक डॉ. काशीनाथ चौधरी उपस्थित होते. निवेदनात म्हटले की, रुग्णांना घाटीतून औषधी देणे अपेक्षित आहे. किमान साध्या आजारात तरी रुग्णालयातच औषधी मिळाली पाहिजे. सुपरस्पेशालिटी ब्लॉकची इमारत तयार झाली आहे. मात्र, याठिकाणी सुपर स्पेशालिटीचे उपचार उपलब्ध नाहीत. हृदयरोग विभागातून बायपास, अँजिओग्राफी करणे शक्य झाले पाहिजे. रुग्णांना दाखल करताना स्ट्रेचर नातेवाइकांनाच ओढावे लागतात. याशिवाय विविध चाचण्या करण्यासाठी रुग्णालयात फिरावे लागते.

यासाठी रुग्णालयातील रुग्णवाहिका कामी आल्या पाहिजेत. पण, प्रत्यक्षात रुग्णवाहिका उपलब्ध होत नसल्याने नातेवाइकांना स्ट्रेचर ओढून न्यावे लागते. प्रसूती विभागात महिलांना जमिनीवर झोपण्याची वेळ येते. घाटीत अनेक वॉर्ड आहेत. महिलांसाठी असे वॉर्ड खुले करून दिले पाहिजेत. रस्त्यावर होणारी पार्किंग बंद करा. घाटीतील वॉर्ड आणि परिसरात अस्वच्छता आहे.

त्यामुळे सफाई कर्मचाऱ्यांना त्यांचे काम नित्य नियमाने करण्यास बाध्य करा. नर्सिग स्टाफ, शिकाऊ डॉक्टरांनी रुग्ण आणि नातेवाइकांना आजाराची संपूर्ण कल्पना देऊन त्यांना मानसिक आधारही द्यावा, आदी मागण्या करण्यात आल्या. या मागण्यांवर अधिष्ठाता डॉ. रोटे यांनी सकारात्मक बदल करण्याची ग्वाही दिली.

बातम्या आणखी आहेत...