नागरिकांचे महत्वाचे प्रश्न सोडवा:आम आदमी पार्टीचा गंभीर आरोप; जनतेच्या प्रश्नांकडे शिंदे - फडणवीस सरकारचे दुर्लक्ष
नागरिकांचे महत्वाचे प्रश्न सोडवा अन्यथा नागपूर अधिवेशनादरम्यान 'आप' चा मोर्चा येईल. या आशयाचे निवेदन आम आदमी पार्टी जिल्हाअध्यक्ष तथा शहर कार्याध्यक्ष रघुनाथ पाटील यांच्या नेतृत्वात जिल्हा कलेक्टर यांच्यामार्फत मुख्यमंत्री यांना देण्यात आले.
नुकतेच सत्तेवर आलेले शिंदे फडणवीस सरकारच्या असंवेदनशील कारभारामुळे शिक्षण, निवारा, वीज, सरकारी नोकऱ्या, शेतकरी - शेतमजूर व शेती , इत्यादी क्षेत्रातील दैनंदिन प्रश्न सुटणं कठीण झालं आहे. या संदर्भात आज आम आदमी पार्टी वतीने मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले.
या आहेत मागण्या
- संपूर्ण राज्यात ओला दुष्काळ जाहीर करून नुकसान भरपाई प्रती हेक्टरी 50 हजार देण्यात यावी. पीक विमा कंपनीला सरसकट पिक विमा देणे अनिवार्य करावे.
- शेतमजुरांना रोजगार हमी योजनेअंतर्गत काम देण्यात यावे.
- शेतीला दिवसा 12 तास वीज पुरवठा करावा, थकीत वीज बिल व शेती कर्ज माफ करावे.
- सर्व विभागातील रिक्त पदे भरण्यासाठी तातडीने निर्णय घावेत, अंश कालीन कर्मचाऱ्यांना तातडीने कायम करण्यात यावे.
- सरकारी शाळा दिल्लीच्या धर्तीवर दर्जेदार कराव्यात, कमी पट संख्या असलेली एकही शाळा बंद होणार नाही याची हमी द्यावी.
- खाजगी शाळा प्रशासनाकडून पालकांची होणारी आर्थिक लुट थांबविण्यासाठी शुल्कावर नियंत्रण आणावे व शिक्षण अधिकार कायद्याची काटेकोर पणे अंमलबजावणी करण्यात यावी.
- पंतप्रधान आवास योजनेतील रखडलेला निधी तात्काळ उपलब्ध करून द्यावा.
- अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला आदिवासी व बिगर आदिवासिंना वन जमिनीचे पट्टे देण्याचा प्रश्न निकाली काढून वाहितदारांना पट्टे देण्यात यावे.
- वन्य प्राण्याचा बंदोबस्त करण्यासाठी अस्तित्वाव असलेल्या कायद्यात बदल करावा.
- या मागण्या मान्य न झाल्यास हिवाळी अधिवेशना दरम्यान नागपूर येथे आम आदमी पार्टीच्या वतीने तीव्र आंदोलन केले जाईल असे निवेदनात नमूद केले आहे.
- प्रसार माध्यमाचे बोलताना रघुनाथ पाटील यांनी हे सरकार स्व केंद्रीत झालेली आहे त्यांना जनतेच्या प्रश्नापेक्षाही स्वतःचे प्रश्न स्वतःच्या आमदारांना व मंत्र्यांना संभाळणे नाराजी दूर करणे इत्यादी कामातच त्यांना रस आहे. जनतेच्या प्रश्नाकडे सबसेल दुर्लक्ष करणारे हे अपयशी सरकार आहे असा आरोप केला.