आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

“रूबरू’ कार्यक्रम:गजानन महाराज मंदिर चौकातील हातगाड्यांचा प्रश्न सोडवा : वैद्य

औरंगाबाद5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गजानन महाराज मंदिर चौक आणि पुंडलिकनगर रोडवर उभ्या राहणाऱ्या हातगाड्यांमुळे वाहतूक कोंडी होते. या हातगाडीवाल्यांना व्यवसायासाठी स्वतंत्र जागा द्यावी तसेच नशाखोरी आणि कचरा व्यवस्थापन अधिक प्रभावी करावे, अशी मागणी विद्यानगर वॉर्डातील नागरिकांनी ६ नोव्हेंबर रोजी दिव्य मराठीने आयोजित केलेल्या “रूबरू’ कार्यक्रमात केली. या कार्यक्रमाची दखल घेत माजी नगरसेवक रेणुकादास वैद्य यांनी मनपा प्रशासक डॉ. अभिजित चौधरी, पोलिस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांच्याकडे सोमवारी निवेदनाद्वारे मागणी केली आहे. निवेदनासोबत दिव्य मराठीत प्रकाशित झालेल्या वार्तांकनाची प्रतदेखील जोडली आहे. तसेच या समस्या तत्काळ सोडवा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...